वडील सलून दुकान चालवतात, घरची परिस्थिती बेताची असूनही MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश, आज बनली RTO अधिकारी

दरवर्षी लाखो उमेदवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. परंतु, यात काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. नुकतेच यावर्षी झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात एका तरुणीने चांगले यश संपादन करून आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे.

काटोल येथील रहिवासी असलेली सृष्टी दिवाकर नागपुरे हिच्या वडिलांचे छोटेसे सलून दुकान आहे. घरात एकटे कमवते असल्यामुळे घरची परिस्थिती देखील फारशी चांगली नाही. परंतु मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अधिकारी बनवण्याचे असे दोघांचे ही स्वप्न होते.

सृष्टीने वायसीसी कॉलेजमधून आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर तिला खासगी कंपनीत नोकरी मिळाली. यानंतर तिने एमपीएससी परिक्षा देण्याचा निश्चय केला आणि जोराने अभ्यास करायला सुरुवात केली. नोकरी आणि अभ्यास या दोघांचा ही सृष्टीने चांगला समतोल राखला.

अखेर आपल्या परिस्थितीला तोंड देत सृष्टी नागपुरे हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड करण्यात आली आहे.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सृष्टीने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. सृष्टीची मोठी बहीण देखील पशुधन अधिकारी म्हणून आपले कार्य बजावत आहेत. दोघींनीही आपल्या परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.

एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तिला तिच्या मोठ्या बहिणीची प्रेरणा खूप महत्वाची ठरली. तसेच नेहमी आईवडिलांनी दिलेली साथ यामुळे सृष्टीने आज हे यश मिळवले आहे असे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page