वडिलांच्या नि’धनानंतर अवघ्या 17 व्या वर्षी घेतली चहाच्या दुकानाची जबाबदारी.. आज MA पास चायवाली म्हणून आहे प्रसिद्ध

भारतातील चहा व्यवसाय आता फक्त गरीब आणि गरजू लोकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर सुशिक्षित असलेले तरुण देखील हा व्यवसाय एक चांगला स्टार्टअप म्हणून सुरू करत आहेत. त्यामुळे चहाच्या स्टार्टअपला वेग आला आहे.

सुशिक्षित तरुणांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या चहाच्या स्टार्टअपबद्दल तुम्हाला दररोज ऐकायला मिळत असेलच. बेवफा चाय वाला, ग्रॅज्युएट चाय वाला, एमबीए चाय वाला इत्यादींबद्दल माहित असेलच. पण आज आपण एमए चायवाली बद्दल पाहणार आहोत. चला तर मग पाहूया एमए चायवली हिच्या संघर्षाबद्दल.

अंजना रावत या मूळ उत्तराखंड मधील श्रीनगर येथील आहेत. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्या चहा विकत आहेत. जवळपास 12 वर्षांपासून ते हे करत आहे. त्यामुळे त्या सध्या सो’श’ल मी’डि’यावर खूप चर्चेत आहेत. आजकालचे तरुण-तरुणी चहाव्यवसायासंबंधी अभ्यास करून चहाचे स्टॉल उघडत असतात, परंतु चहा विकणाऱ्या या अंजना रावत यांची गोष्ट थोडी वेगळी आहे.

अंजना यांचे वडील गणेश हे चहाचे दुकान चालवायचे पण दु’र्दै’वा’ने त्यांना गं’भी’र आजाराने ग्रासाले होते. या गं’भी’र आजारामुळे त्यांनी दुकानात जाणे बंद केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंजना यांनी वडिलांच्या चहाच्या दुकानाची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि वडिलांची देखील त्या उत्तम प्रकारे काळजी घेत होत्या. काही काळानंतर त्यांचे नि’ध’न झाले.

वडिलांच्या नि’ध’ना’नं’त’र अवघ्या 17 व्या वर्षात सर्व जबाबदारी अंजना यांच्या खांद्यावर पडली आणि पडली ती आयुष्यभरसाठीच.. त्यांच्या वडिलांचे चहाचे दुकान हे अंजना आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे.

लहान वयातच सर्व जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी वेळेची कमतरता भासू लागली आणि त्यामुळे त्या चहाच्या दुकानात बसून अभ्यास करायच्या. चहाच्या दुकानातून कष्टाने कमावलेल्या पैशातून त्यांनी त्यांच्या बहिणीचे लग्न लावून दिले आणि स्वतः एमए पर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केले.

आपल्या समाजात आजही मुलगा-मुलगी असा भे’द’भा’व केला जातो आणि अंजना यांना देखील याचा सामना करावा लागला होता. जेव्हा त्या चहाच्या स्टॉलवर बसायच्या तेव्हा लोक त्यांची ये-जा करताना चेष्टा-मस्करी करायचे. हे मुलांचे काम आहे मुलींचे नाही असे म्हणून त्यांना हि’ण’व’ले जायचे.

मात्र समाजातील लोकांच्या टोमण्यांनी अंजना यांनी आपला धीर खचू दिला नाही. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण सर्वकाही करू शकतो. याच विचाराने अंजना पुढे जात राहिल्या. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या आपले काम आणि अभ्यास करत राहिल्या.

बदलत्या काळानुसार लोकांचे विचारही बदलत असतात. एमए पास झाल्यावर एमए चायवाली म्हणून प्रसिद्ध झालेल्या अंजना यांना जे लोक आधी चहा विकल्याबद्दल टोमणे मारायचे त्यांची चेष्टा करायचे, आज तेच लोक त्यांच्या दुकानात जावून चहाचा आस्वाद घेतात आणि त्यांचे कौतुक देखील करतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंजना गेल्या 12 वर्षांपासून चहा विकत आहे. परंतु त्यांची परिस्थिती अजूनही फारशी चांगली नाही, तरीही त्या धैर्याने वागतात. अधिक मेहनत करून पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे त्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळेल.

अंजना यांचा प्रवास हा एक संघर्ष आहे, तरीही त्यांनी अजून धीर सोडलेला नाही. धैर्याने संघर्षाला सामोरे जात त्यांना आपले ध्येय गाठायचे आहे. त्यांच्या आईला चांगले आयुष्य जगता यावे म्हणून त्यांचे आयुष्यात काहीतरी बनण्याचे स्वप्न आहे. अंजना यांची धैर्य आणि चिकाटी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page