ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे कार तिथेच सोडून डॉक्टरांनी 45 मिनिटात गाठले रूग्णालय, वेळेवर पोहचून दिले रुग्णाला जीवनदान..

कोणतेही डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाचे वाईट व्हावे या दृष्टिकोनातून कधीही उपचार करत नाहीत. आपल्याकडे आलेल्या रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान व्हावे व त्यांच्यावर चांगले उपचार मिळून रुग्ण बरा व्हावा हे डॉक्टरांचे प्रयत्न असतात. अशाच एका डॉक्टरांची गोष्ट आज आपण पाहणार आहोत.

गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. गोविंद नंदकुमार गेल्या 18 वर्षांपासून मणिपाल या रुग्णालयात गै’स्ट्रोएंटरोलॉजी स’र्ज’न म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 1 हजारहून अधिक श’स्त्र’क्रि’या यशस्वीरित्या केलेल्या आहेत. पचनसंस्थेशी संबंधित असलेल्या श’स्त्र’क्रि’या करण्यात डॉ.नंदकुमार हे अतिशय निपुण आहेत.

30 ऑगस्टला डॉ. गोविंद नंदकुमार हे एका रुग्णाच्या पित्ताशयाच्या पिशवीवर श’स्त्र’क्रि’या करण्यासाठी मणिपाल रुग्णालयात जात होते. त्यावेळी सरजापूर-मराठाहल्ली परिसरात रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

श’स्त्र’क्रि’या करण्याची वेळ जवळ आली होती आणि वाहतूककोंडी सुरळीत होण्याची शक्यता काही दिसत नव्हती. सुरळीत होण्याची वाट पाहत राहिल्यास श’स्त्र’क्रि’या करण्यास उशीर होईल म्हणून त्यांनी त्यांची कार तिथेच ठेवली आणि धावत धावत रुग्णालय गाठण्याचे त्यांनी ठरवले आणि ते पळत सुटले. त्यांनी 3 किलोमीटरवर असणारे मणिपाल रुग्णालय 45 मिनिटात गाठले.

डॉ. गोविंद नंदकुमार म्हणतात,”मला कनिंघम येथून सरजापूर येथे असलेल्या मणिपाल रुग्णालयात पोहचायचे होते. त्यात खूप मुसळधार पाऊस होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. काही परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ”

“त्यात वाहतूक पूर्वरत होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे मी कार तिथेच ठेवून जवळपास 45 मिनिटे धावत येवून रुग्णालय गाठले. कारण जोपर्यंत श’स्त्र’क्रि’या पार पडत नाही तोपर्यंत रुग्णांना काहीही खाता येत नाही. त्यामुळे मी रुग्णांना जास्त काळ वाट पाहायला लावू शकत नव्हतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page