हा पठ्ठ्या चक्क भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो तब्बल 90 हजारांचा भाजीपाला..

आपल्याजवळ जर जिद्द आणि चिकाटी असेल आणि आपल्यात काम करण्याची इच्छा असेल तर मेहनत करून व्यक्ती सहज यश मिळवू शकतो. मध्यप्रदेशातील एका तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे. भाजीपाल्याचा व्यवसाय करुन तो करोडपती झाला आहे.

शुभम बिलथरे असे हा तरुणाचे नाव असून तो मध्यप्रदेशातील सागर येथील आहे. शुभम हा 30 वर्षांचा आहे आणि त्याचे शिक्षण केवळ 12वी पर्यंत झाले आहे. मात्र, आज शुभमने ‘भिंडी बाजार’ या नावाने स्टार्टअप सुरू करून करोडपती झाला आहे.

शुभमला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, कॉलेजची फी भरू न शकल्यामुळे त्याला बी.टेकचे शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, त्याला नेहमीच काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने हार न मानता मेहनतीने ऑ’न’ला’ई’न भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. याद्वारे तो आता वर्षाला 4 कोटींची उलाढाल करत असतो. यातून तो वर्षाला सुमारे 1.5 कोटींचा नफा कमावत आहे.

शुभम सांगतो, त्याने 2013 ते 2020 पर्यंत जवळपास 10 ते 12 नोकऱ्या केल्या होत्या. त्यातून तो दरमहा 10 ते 12 हजार रुपये कमवत असत. परंतु, नेहमी त्याला आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असे वाटायचे. यावर त्याने विचार करून व्यवसाय करण्याचा ही निर्णय घेतला. त्याने नोकरीसोबतच वेब डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी ऑ’न’ला’इन होम डिलिव्हरीची मागणी वाढू लागली. या काळात बरेच लोक ऑ’न’ला’ईन भाजीपालाही मागवत असत.

याचाच विचार करून शुभम मुंबईहून मध्यप्रदेश येथील सागर मध्ये गेला. यानंतर त्याने भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा निश्चय केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची भरपूर ऑ’न’ला’ईन डिलिव्हरीसाठी मागणी वाढत गेली. अशा प्रकारे आज शुभम चे 4 स्टोअर आहेत. यापैकी एक सिधगाव येथे आहे आणि उर्वरित 3 दुकाने मक्रोनिया या परिसरात आहेत.

शुभम बाजारातून भाजीपाला खरेदी करतो आणि बाजारापेक्षा 5% कमी दराने भाज्यांची लोकांपर्यंत ऑ’न’ला’ई’न डिलिव्हरी करत असतो. यामुळे ग्राहकही खुश असतात आणि मागणी देखील वाढते. यानंतर त्याने आता ‘भिंडी बाजार’ या नावाचे नवीन ॲप आणि वेबसाइट तयार केली आहे. या ॲपद्वारे ग्राहक थेट वेबसाइट किंवा ॲपला भेट देऊन फळे किंवा भाज्यांची ऑर्डर देऊ शकतात. शुभमने घरोघरी जाऊन अनेकांना या व्यवसायाबद्दल सांगायला सुरुवात केली होती. सुरुवातीला लोकांचा विश्वास नव्हता मात्र, हळुहळू त्यांचे ग्राहक वाढत गेले.

याबरोबरच शुभमने शहरात जिथे ग्राहकांची जास्त गर्दी असते अशा मोठ्या दुकानांमध्ये काही टक्के कमिशन देऊन भाजीचे स्टॉल लावायला सुरुवात केली. त्याच्या या कल्पनेमुळे अनेक ग्राहक थेट शुभमशी जोडले जाऊ लागले आणि याचा फायदा शुभमचा व्यवसाय वाढवण्यात मदत झाली. या व्यवसायात त्याचा भाऊ देखील त्याच्यासोबत काम करतो. त्यांची 15 जणांची टीम आहे. सर्व भाज्या घरपोच आणि बाजारभावात मिळत असल्यामुळे ग्राहकदेखील खूश हेत यामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अशा प्रकारे ते दिवसाला जवळपास 90 हजारांचा भाजीपाला विकत असतात. शुभम हा त्याच्या परिसरात प्रसिध्द आहे. त्याने खूप कमी काळात आपला व्यवसाय मोठा केल्याने त्याचे सगळ्यांनाच कौतुक वाटत असते. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page