डीसीपी वडिलांनी आपल्या IPS मुलीला केला सलाम, उपस्थित सगळेच झाले चकित, वडिल म्हणाले..

मोठे अधिकारी बनण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड पैसा असावा, तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला खूप महागड्या क्लासेस किंवा शाळा-महाविद्यालयांमध्ये टाकावे, हे गरजेचे नसतं. आवश्यक असते ती फक्त तुमची जिद्द, तुमचे कामाप्रतीचे समर्पण आणि आत्मविश्वास. प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलाने मोठे होऊन चांगले यश मिळवावे अशी इच्छा असते.

आपल्या पालकांना, मुलांनी आपली समाजात एक चांगली ओळख निर्माण करावी असे नेहमी वाटत असते. जेव्हा अशा गोष्टी सत्यात उतरतात तेव्हा मुलांच्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावते. असाच काहीसा प्रकार तेलंगणा मधून समोर आला आहे. ज्यात मुलीने एसीपी बनून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

हैदराबाद मधील तेलंगणाच्या जगतियाल येथील उमामहेश्वर शर्मा हे हैदराबाद पोलिस ठाण्यात डीसीपी म्हणून तैनात आहेत आणि आता त्यांची मुलगी सिंधू शर्मा ही चार वर्षांपूर्वी आयपीएसमध्ये रुजू झाली आहे.

विशेष म्हणजे एके दिवशी रविवारी रंगा रेड्डी येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत हे दोघेही म्हणजेच डीसीपी वडील उमामहेश्वर शर्मा आणि त्यांची IPS मुलगी सिंधू शर्मा ड्युटीवर असताना अचानक समोरासमोर आले. या वेळी डीसीपी म्हणून तैनात असलेल्या वडिलांनी त्या मेळाव्यात सर्वांसमोर आपल्या एसपी मुलीला सलाम केला आहे. एक वडील आपल्या मुलीला सलाम ठोकताना पाहून उपस्थीत सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

गेले तीन दशके पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या उमामहेश्वर शर्मा म्हणतात, “मला माझ्या मुलीच्या या यशाचा खूप अभिमान आहे. ड्युटीवर कार्य बजावत असताना माझी मुलगी माझ्यासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ही संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे.”

सिंधू ही माझी वरिष्ठ अधिकारी आहे, जेव्हा मी माझ्या मुलीला ड्युटीवर पाहतो तेव्हा मी तिला सलाम करतो. कारण जरी मी तिचा वडिल असलो तरीही तिचे पद माझ्यापेक्षा मोठे आहे. घराबाहेर आम्ही दोघेही आपापली कर्तव्ये चोखपणे पार पाडत असतो. परंतु, घरात आम्ही दोघे ही एका सामान्य बाप मुलीप्रमाणे राहतो, असेही उमामहेश्वर शर्मा सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page