हा ट्रक गेल्या 11 महिन्यापासून गुजरात ते राजस्थान 540 किमीचे अंतर पार करत आहे

आजकाल रस्त्यावरील वाहनांची संख्या अधिक झाली आहे. प्रत्येक जण आजकाल गाडीचा वापर करताना आपण पाहत असतो. यामुळे ट्रॅफिकचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा वेळेस मोठे कंटेनर तसेच ट्रेलर्ससारखी अवजड वाहने शहरात चालवणे कठीण जाते आणि यामुळेच अनेक शहरांमध्ये अशा वाहनांना रात्रीच्या वेळी म्हणजेच कमी रहदारीच्या वेळी प्रवास करावा लागतो.

परज्याराज्यातू अवजड वाहने प्रवास करत असतात. त्यांना एक दोन दिवस लगतात आपला प्रवास करण्यासाठी हे आपण पाहतो. परंतु आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या याचा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’वर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ राम दर्जी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेला ट्रक आणि ट्रेलर हा गुजरातमधील मुंद्रा बंदर येथील असून ते राजस्थानमधील पाचपदरा रिफायनरी असा प्रवास करत आहेत. या दोन ठिकाणांमधील अंतर हे सुमारे 540 किमी आहे. साधारणतः हे एवढे अंतर पार करण्यासाठी 11 ते 12 तास लागतात.

परंतु हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या व्हिडिओ मध्ये दिसणारा हा ट्रक तब्बल गेल्या 11 महिन्यांपासून प्रवास करत आहे. तो ट्रक अद्याप रस्त्यावर आहे. याचे कारण देखील असेच आहे. या ट्रक मधून ते राजस्थान येथील पाचपदरा रिफायनरीसाठी बॉयलर घेऊन जात आहेत.

हा बॉयलर प्रचंड मोठा आणि जड आहे. याचे वजन तब्बल 1000 टनांपेक्षाही जास्त आहे. यासाठी विशेष उपकरणे वापरली गेली आहेत. या बॉयलरची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रेलर एवढा लांब आहे की या ट्रक ला जवळपास 448 टायरस् आहेत.

या ट्रक मधून नेण्यात येणारी वस्तू ही प्रचंड मोठी आणि जड आहे. त्यामुळे यासाठी अशा ट्रक चा वापर केला गेला आहे. यामुळे रस्त्यावर अशा अवजड वाहनाला चालवणे त्यांच्यासाठी खूप अवघड जात आहे. या ट्रक ड्रायव्हरला मार्गदर्शन करून वाहतूक सुरळीत करणारा एक विशेष दल आहे.

काहीजण हा ट्रक प्रत्यक्षात येण्यापूर्वी रस्ता आणि वाहतूक क्लिअर करतात. यामधे जवळजवळ 25 लोक आहेत जे हा प्रवास सुरळीत व्हावा याची पाहणी करत आहेत. अनेक भागांत रस्त्याच्या वरील बाजूस तारा आहेत आणि ट्रक ची उंची जास्त असल्यामुळे तिथून प्रवास करताना तेथील वीज पुरवठा विज विभागाशी समन्वय साधून काही काळासाठी स्थगित केला जातो. तसेच हा ट्रक पुलांवरून प्रवास करू शकत नाही. याचे वजन आणि लांबी बघता पुलांवरून प्रवास करने धोक्याचे आहे, असे म्हटले जात आहे.

अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी पुलाच्या शेजारी ट्रेलरसाठी बायपास तयार करावा लागत आहे. या सर्व कारणांमुळे त्यांना इतका वेळ लागत आहे. असे सांगितले जाते. ते दररोज सुमारे 10-15 किमी प्रवास करतात. त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी किमान दीड महिने लागतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page