ऊसतोड कामगार असलेले दाम्पत्य एका रीलमुळे रातोरात प्रसिद्ध झाले, पण त्यांच्या प्रसिद्धीला कोणाचीतरी नजर लागली आणि..

आपले नशीब कधी कलाटणी देईल हे काही आपण सांगू शकत नाही. सध्या सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून रातोरात एखादी व्यक्ती खूप प्रसिद्ध होऊ शकते हे आपण पाहतच आहोत. परंतु, या माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिध्दीचे जसे फायदे आपल्याला पाहायला मिळत असतात त्याप्रमाणे त्याचे काही तोटे देखील त्यांना सहन करावे लागत असतात.

आज आपण अशीच एक घटना जाऊन घेणार आहोत, ज्यात ऊसतोड कामगार मनिषा आणि अशोक हजारे या दाम्पत्याला ते प्रसिद्ध झाल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागला आहे. बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले मनिषा हजारे आणि अशोक हजारे हे दाम्पत्य कर्नाटक येथे ऊसतोड कामगार म्हणून काम करतात.

ऊसतोडणी करून ते त्यांचे कुटुंब चालवतात. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. हाच ट्रेंड फॉलो करून आनंद घेण्यासाठी या दाम्पत्याने एक स्मार्ट फोन विकत घेतला. दिवसभर काम करून त्यांना जो वेळ मिळत असे त्यात ते थोडा वेळ काढून इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत असे.

ते सातत्याने आपले व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतं. नवनवीन व्हिडिओ बनवून ते जीवनाचा आनंद घेत होते. यादरम्यान एके दिवशी त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि तो व्हायरल व्हिडीओ लोकांना देखील आवडला आणि लोकांनी त्यांना रातोरात खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

अनेकांना या दाम्पत्याचे व्हिडिओ खूप आवडत असत. ते ज्याप्रकारे जीवनाचा आनंद घेत गरिबीतून पुढे येत होते ते पाहून अनेकांना त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळत होती. सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू असायची. ते दिसले की त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकजण उत्सुक असायचे. ही प्रसिध्दी पाहून या जोडप्याला खूप आनंद झाला होता. त्यांनी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता ते त्यांना आता अनुभवयाला मिळत होते.

परंतु, अचानक त्यांच्या या प्रसिद्धीला कोणाची तरी नजर लागली कारण काही समाजकं’ट’कां’नी या दाम्पत्याचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅ’क केले. एवढेच नव्हे तर अकाऊंट हॅ’क करून ते त्यावर चुकीचा संदेश देणारे व्हिडीओ पोस्ट करू लागले होते तसेच या दाम्पत्याला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

या दाम्पत्याला या प्रकरणानंतर प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून अनेकजण त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. तसेच त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील देत आहेत.आता हजारे दाम्पत्याला या त्रासातून मुक्तता मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page