घशात काजू अडकून दोन वर्षाच्या बाळाचा झाला मृ’त्यू, आईवडिलांच्या डोळ्यांसमोर एकुलत्या एका मुलाने सोडले प्राण..

घरातील लहान मुलांवर लक्ष ठेवणे म्हणजे मोठे दिव्यच असते. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांना नेहमी सावध राहावे लागत असते कारण आपला हलगर्जीपणा अनेकवेळा मुलांच्या जीवावर बेतू शकतो. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच बिहार येथून समोर आली आहे, ज्यात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा घश्यात काजू अडकल्यामुळे दु’र्दै’वी मृ’त्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बिहारमधील चंपारण येथील असून कार्तिक कुमार असे या चिमुकल्याचे नाव आहे. घटना घडली त्यादिवशी कार्तिक घरात एकटाच खेळत होता. खेळात-खेळता त्याचे लक्ष बाजूला असलेल्या टेबलवर ठेवलेल्या वाटीकडे गेले. त्या वाटीत काजू ठेवलेले होते, ते पाहून त्या चिमुकल्याने पटकन टेबलजवळ जाऊन एक काजू उचलून आपल्या तोंडात टाकला.

परंतु, काजू खाल्ल्यानंतर त्याच्या घशात वेदना होऊ लागल्या आणि त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला. कार्तिकने खाल्लेल्या काजूचा तुकडा त्याच्या श्वसननलिकेत अडकला गेल्यामुळे त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यामुळे त्याने जोरजोराने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्याचा आवाज ऐकून त्याच्या आई-वडीलांनी त्वरित कार्तिककडे धाव घेतली.

त्यांनी आपल्या मुलाचा त्रास बघून त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित कार्तिकवर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी या चिमुकल्याला वाचवण्यासाठी तब्बल 20 मिनटे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, यादरम्यान या चिमुकल्याला आपला जीव ग’म’वा’वा लागला.

आईवडिलांच्या एकुलता एका मुलाचा त्यांच्या डोळ्यांसमोर मृ’त्यू झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना या घटनेचा खूप मोठा धक्का बसला आहे. डोळ्यांसमोर आपल्या मुलाचे प्रा’ण गेलेले पाहून कार्तिकच्या आईचा आक्रोश पाहवत नव्हता. या घटनेनेमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात देखील या घटनेने शो’क’का’ळा पसरली आहे.

अशा अनेक घटना आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने सावध राहून आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण आपला थोडासाही निष्काळजीपणा आपले खूप मोठे नुकसान करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page