कोल्हापूरच्या ‘या’ तरुणाने आपल्या छंदालाच बनवले आपले करिअर, आता वर्षाला लाखो रुपये कमवत आहे

आजच्या काळात मूलभूत गरजा या अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा या आहेत. आजकाल आपली जी काय धावपळ करत आहोत ती पैसे कमवण्यासाठी. अनेकदा जे मिळेल ते काम आपल्याला करायला लागते, भले ते आपल्या आवडीचे नसले तरी, कारण आपल्याला पैसा हवा असतो.

परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने आपल्या छंदालाच आपले काम बनवले आहे. कोल्हापूर येथील शेतकऱ्याचा मुलगा त्याचा छंद जोपासून वर्षाला लाखो रुपये कमवत आहे.

आजकाल असे अनेक तरुण आहेत ज्यांना आपल्या छंदाला कमाईचे साधन कसे बनवायचे याबाबत माहिती नसते. याच लोकांप्रमाणे कोल्हापूर येथील युवराज पाटील यांना चित्रकलेचा छंद होता. पण त्यांनी याला त्यांचे कमाईचे साधन बनवले नाही.

जेव्हा त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांनी सुरवातीला नोकरी करायला सुरुवात केली. परंतु नोकरीत देखील त्यांना तुटपुंजा पगार मिळत असे. यातून उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. त्यांचे मन मात्र चित्रकलेतच रमले होते.

त्यांच्या आयुष्याला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांचे एक चित्र 25000 रुपयांना विकले गेले. जेव्हा त्यांचे हे चित्र एवढ्या मोठ्या किमतीत विकले गेल्यावर त्यांच्या आत्मविश्वास पूर्णपणे वाढला. यातून पैसे देखील मिळू शकतात यावर त्यांचा विश्वास निर्माण झाला.

यानंतर त्याने आपला छंद जोपासण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्याने स्वतः अजून काम केले आणि चित्रकलेत आणखी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याने भारतातील अनेक ठिकाणी जाऊन अनेक कलादालनाशी संपर्क साधला. यामुळे त्याच्या कलेची हळूहळू विक्री होऊ लागली.

आतापर्यंत युवराजने 200 हुन अधिक पेंटिंग्ज बनवली आहेत. त्याची कला फक्त भारतातच नव्हे तर आता भारताबाहेर देखील पोहोचली आहे. यातून त्याने लाखो रुपये कमावले आहेत. तसेच त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

आज तो त्यांचा छंद जोपासून वर्षाला जवळपास 10 लाखांची कमाई करत आहे. हा प्रवास सोपा नव्हता, स्वतःला सिद्ध करणे अवघड काम होते. परंतु त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. त्याची मेहनत आणि आत्मविश्वास यामुळेच आज तो यशाच्या शिखरावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page