या तरुणाने हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या गरीब मुलांना हॉटेलमध्ये जेवण खाऊ घातले, त्यांनतर बिल पाहिले तर..

आपल्या रोजच्या जीवनात घडत असणाऱ्या लहान-मोठ्या घटनांमधूनच माणसांमधील माणुसकी जिवंत आहे की नाही हे समजत असते. माणुसकीच्या नियमांमध्ये पहिला नियम म्हणजे दुसऱ्यांना निस्वार्थीपणे मदत करणे हा आहे. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना केरळमधून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मल्लपुरममधील तरुण अखिलेश कुमार हा आपले काम संपवून रात्री मल्लापुरम येथील साबरी रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेला होता. हॉटेलमध्ये जेवत असताना अचानक त्याचे लक्ष हॉटेल बाहेर गेले तेव्हा त्याला हॉटेलच्या बाहेर दोन मुलं जेवणाच्या आशाने एकटक हॉटेलकडे पाहत असलेले दिसले. त्यांना भूक लागली असावी असे अखीलेशला वाटले.

त्यांनतर अखिलेशने त्या दोन्ही मुलांना हातवारे करून त्याच्याजवळ यायला सांगितले. यानंतर अखिलेशने त्या दोन मुलांना टेबल वर बसवले. दोन्ही मुलांना टेबलवर बसवून अखिलेशने त्यांना “तुम्ही काय खाणार?” असे विचारले असता त्या मुलांनी अखिलेशच्या ताटाकडे हात दाखवला. त्यांनतर अखिलेशने त्या दोघांसाठी जेवणाचे ताट मागवले आणि त्या दोघांना हात धुऊन येण्यास सांगितले.

जेवणाचे ताट आल्यानंतर त्या दोन्ही मुलांनी आनंदाने पोटभर जेवण केले. अखिलेश जात असताना त्या दोघांनी त्याच्याकडे पाहून एक गोड स्मितहास्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अखिलेशला ही खूप छान वाटले. त्यांनतर अखिलेशने हॉटेल मधील वेटरला जेवणाचे बिल विचारले. बिल पाहून अखिलेशला आश्चर्यच वाटले. त्याने ह्या आधी असे बिल कधी पहिलेच नव्हते.

हॉटेलने दिलेल्या बिलात रक्कम दिलेली नव्हती तर त्यात एक छानसा संदेश लिहिला होता. ज्यात असे लिहिले होते की, “आमच्याकडे अशी मशीन नाही जी मानवतेचे बिल देऊ शकेल! तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुम्ही सदैव आनंदी रहा.” असा संदेश वाचून अखिलेश खूप भावूक झाला. त्यांनतर त्याने या बिलाचा फोटो सो’श’ल मी’डि’या अकाउंटवर पोस्ट केला.

अखिलेश हा दुबईतील एका चांगल्या कंपनीत काम करतो. ही घटना 2013 मधली असून मी ही घटना लिहून ठेवली होती असे ते सांगतात. माणसांमधील माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक आहे. या व अशा अनेक कॉमेंट्स करत सो’श’ल मी’डि’या’व’र अखिलेशचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page