साखरपुडा झाला, लग्नपत्रिकाही छापून झाल्या होत्या, मात्र या एका कारणासाठी मुलीने लग्न मोडले..

लग्न म्हंटले की घरी उत्साहाचे वातावरण असते. तसेच लग्नात लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीची देखील घाई सुरू झालेली असते. त्यात कपडयांची खरेदी म्हंटले की वेळ कसा जातो कळतच नाही. वधू आणि वरासाठी त्यांच्या पसंतीने कपडे घेतले जातात. मात्र, उत्तरखंड येथून एक अनोखाच प्रकार समोर आला आहे. ज्यात वधूने कपड्यांवरून लग्नासाठी मुलाला नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरखंड येथील हल्दवानीमधील राजपूरा परिसरातील रहिवासी असलेला तरुण हा एका कंपनीत नोकरीस आहे. त्याचे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. जून महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.

तसेच पाच डिसेंबरला त्यांचे लग्न देखील होणार होते. लग्नाच्या पत्रिकाही छापून झाल्या होत्या, एवढेच नव्हे तर पत्रिका वाटून देखील झाल्या होत्या. लग्न थोड्याच दिवसांवर येऊन ठेपले होते आणि त्यातच मुलीने लग्नाला नकार दिला. लग्नाचे कारण ऐकून मुलाकडील लोकांना आश्चर्यच वाटले आहे.

लग्न म्हंटले की कपडयांची खरेदी ही आलीच. अशातच लग्नासाठी मुलाकडील लोकांनी मुलीला लग्नासाठी तब्बल 10 हजार रुपयांचा लेहंगा खरेदी केला होता. परंतु, अवघ्या 10 हजार रुपयेच लेहंग्याची किंमत असल्यामुळे तरुणी नाराज झाली.

हा लेहंगा लखनौवरुन मागवण्यात आलेला आहे, असे मुलाकडील लोकांनी सांगितले. मात्र, तरीही इतका स्वस्त लेहंगा मला नको, असे त्या तरुणीने सांगीतले. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली आणि हे भांडण थेट पोलिस स्टेशन पर्यंत पोहचले.

कोठीवाला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली होती. पोलिस ठाण्यात अनेक वेळ दोन्ही कडील लोकांचे वाद सुरू होते. यावेळेस तरुणाने त्या तरुणीला त्याचे स्वतःचे एटीएम कार्ड देऊन तुला हवा तेवढा महाग लेहेंगा घेऊन ये असेही सांगितले. परंतु, तरीही मुलीने लग्नाला नकार दिला.

अखेर या वादावादी मध्ये वर आणि वधू पक्षाने हे लग्न मोडण्याचे ठरवले. यादरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न ही केला. मात्र, दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न एवढ्या लहान कारणामुळे मोडले गेले. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र या घटनेची तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page