4 महिन्यांच्या ग’र्भ’व’ती पत्नीचा अपघा’तात मृ’त्यू झाल्याचा ध’क्का सहन न झाल्याने पतीने..

जुन्नर येथील धोंडकरवाडी येथील 29 वर्षीय रमेश कानसकर या व्यक्तीचे 22 वर्षीय विद्या जाधव या तरूणीसोबत नुकताच आठ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. रमेश यांच्याकडे एक ट्रॅक्टर होता. त्यांचा ट्रॅक्टरने शेत जमिनीचे सपाटीकरण करण्याचा व्यवसाय होता. तसेच विद्या ही चार महिन्यांची ग’र्भ’व’ती होती.

यादरम्यान 14 ऑक्टोबर रोजी रमेश धोंडकरवाडी येथून दुचाकीवरून आपली पत्नी व सासू या दोघींना घेऊन नारायणगाव येथे खरेदीसाठी आला होता. ते पुन्हा घरी परतत असताना संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वारुळवाडी परीसरात समोरून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली येत होती.

या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का अचानक रमेशच्या दुचाकीला लागला. त्यामुळे विद्या दुचाकीवरून खाली पडली आणि याचदरम्यान ट्रॉलीचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच दु’र्दै’वी अं’त झाला.

रमेशच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या दृश्याने त्याला मोठा धक्का बसला. पत्नीच्या आकस्मित मृ’त्यू’मु’ळे रमेश मानसिकदृष्ट्या अंत्यंत कमजोर झाला होता. दोन-तीन दिवसा पासून त्याने अन्न-पाणी प्राशन केले नव्हते. रमेशला मानसिक त्रास सहान होत नसल्याने अखेर त्याने राहत्या घरात वि’षा’री औषध प्राशन करून आपली जी’व’न’यात्रा सं’प’व’ण्या’चा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर रमेशला त्वरित जुन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान रमेशचे दुःखद नि’ध’न झाले आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

रस्त्यांची न झालेली दुरुस्ती तसेच अशा रस्त्यांवर केली जाणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे या दाम्पत्याला आपला जीव ग’म’वा’वा लागला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page