अंबरनाथच्या रिक्षाचालकाची कौतुकास्पद कामगिरी! आईचे नऊ तोळ्यांचे गंठण मुलगी रिक्षात विसरली, मात्र रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे दागिने केले सुपूर्द..

सध्या पैशांसाठी लोक कुठल्याही थराला जातात. हळूहळू लोक प्रामाणिकपणा मागे टाकत चालले आहेत. एवढेच काय तर सख्खे भाऊ देखील एकमेकांच्या विरोधात असलेले आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु, अजूनही काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा शिल्लक आहे. याचाच प्रत्यय देणारी घटना अंबरनाथ येथून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील घाटकोपर येथील रहिवासी असलेली आस्था निकम हिच्या घराचे काम चालू होते. म्हणून तिने तिच्या आईचे 9 तोळ्याचे गंठण अंबरनाथ येथे राहत असणाऱ्या तिच्या मामाकडे ठेवण्यासाठी दिले होते.

यानंतर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन दिवशी आईचे दागिने लागणार होते, म्हणून ती आईचे दागिने घेण्यासाठी तिच्या मामाकडे अंबरनाथ येथे गेली होती. आईचे दागिने घेऊन ती परत आपल्या घरी परतत होती. तिने अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षा केली होती.

आस्थाने आईचे दागिने तिच्या पर्समध्ये ठेवले होते. ती अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ पोहचल्यानंतर ती रिक्षामधून उतरून रेल्वे स्थानकात गेली. परंतु, ज्या पर्समध्ये तिने आपल्या आईचे 9 तोळ्यांचे गंठण ठेवले होते ती पर्स आस्था रिक्षामध्येच विसरून रेल्वे स्थानकात गेली.

काही वेळानंतर तिला ही गोष्ट लक्षात येताच तिने त्वरित मामाचे घर गाठले आणि घडलेला सगळा प्रकार तिने मामाला सांगितला. यानंतर आस्थाच्या मामाने तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी लगेचच तपास करण्यास सुरूवात केली.

तपासादरम्यान आस्था ज्या रिक्षामध्ये बसली होती ती रिक्षा अंबरनाथ येथील शिवगंगा नगरमध्ये राहणारे रमेश लदगे यांची असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ रमेश लदगे यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी रिक्षाचालक रमेश लगदे यांनी रिक्षात एक मुलगी त्यांची पर्स रिक्षा मध्येच विसरुन गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. जेव्हा पोलीसांनी रमेश यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे सगळा प्रकार सांगत त्यांना त्यांची पर्स परत केली. आस्था यांची पर्स रमेश यांनी उघडुन देखील पहिली नव्हती.

दागिने सापडल्याची माहिती मिळताच आस्था निकम आणि तिचे कुटुंबीय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या सर्वांनी रिक्षाचालक रमेश लदगे यांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार देखील केला. तसेच लगेच रिक्षाचालकाला शोधून काढल्याबद्दल त्यांनी पोलिसांचेही आभार मानले.

पोलिसांनी आस्थाच्या आईचे नऊ तोळ्यांचे गंठण आस्था निकमडे सुपूर्द केले. याची किंमत तब्बल पाच लाख असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत ते दागिने त्याच्या मालकाला सुपूर्द केले. रिक्षाचालकाने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page