AC चालू ठेवून बाहेर जाणे फ्लॅट मालकाला पडले महागात! सोसायटीच्या 7व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली भीषण आ’ग..

ग्रेटर नोएडा पश्चिम मधील बिसरख स्टेशन जवळ असणारी पॅरामाउंट इमोशन्स या हायराईज सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील 705 या फ्लॅट मध्ये शनिवारी रात्री अचानक आ’ग लागली. ही आ’ग झपाट्याने वाढत होती. आ’ग लागलेल्या फ्लॅटच्या वरील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांनी पाणी टाकून ही आ’ग थोड्या प्रमाणत आटोक्यात आणली.

मात्र, आ’ग मोठ्या प्रमाणात पसरली होती यामुळे फ्लॅटच्या बालकनी मध्ये ठेवलेले सगळे साहित्य जाळून राख झाले होते. ही बाब समजताच संपूर्ण सोसायटीमध्ये एकच खळबळ माजली. या फ्लॅटच्या आजूबाजूच्या फ्लॅट मधील सगळे जण भीतीने आपले फ्लॅट बंद करून बिल्डिंगखाली जमा झाले.

यानंतर सोसायटीमधील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमनदलाच्या पथकाला अनेक प्रयत्नांनंतर ही आ’ग आटोक्यात आणण्यात यश आले.

हा भिषण प्रकार घडला त्यावेळेस या फ्लॅट मध्ये राहत असणारे सदस्य बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, बाहेर जाताना या फ्लॅट मधील सदस्यांनी एसी बंद केला नव्हता त्यामुळे बालकनीत असलेल्या एसीच्या स्टॅबिलायझरमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट झाल्याने ही आ’ग लागल्याचे समोर आले आहे.

खूप काळ एसी चालू राहिल्याने स्टॅबिलायझरमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट झाला असावा असे सांगण्यात आले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, फ्लॅट मधील बरेच समान जळून खाक झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page