12 वी नापास असलेल्या तरुणाला अमेरिकन मुलीने घातली लग्नाची मागणी, तरुणाचे नाव देखील गोंदवले, कारण विचारल्यास म्हणाली “संपूर्ण जगात भारतीय पुरुष..

आपल्याला अनेकदा सो’श’ल मी’डि’या’व’र प्रेमाच्या अनोख्या गोष्टी पाहायला मिळत असतात. ज्या आपल्याला थक्क करून टाकतात. अशीच एक घटना हिमाचलप्रदेश येथून समोर आली आहे. यामध्ये अमेरिकेतून भारतात आलेली युवती हिमाचलमधील एका युवकाच्या प्रेमात पडली. ती तरुणाच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने त्याचे नाव देखील गोंदवले आहे. तसेच त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला.

या तरुणीचे नाव केनेडी असून ती काही वर्षांपूर्वी अमेरिकेतून भारतात आली होती. ती हिमाचलप्रदेश मधील डलहौजीमध्ये पर्यटानासाठी आली होती. परंतू, या पर्यटन स्थळाची तिला फारशी काही माहिती नव्हती. तसेच तिची तेथे मुक्कामासाठी कोणतीही व्यवस्था झाली नव्हती. यामुळे ती एके ठिकाणी रडत बसली होती. त्यावेळेस एक युवक केनेडी जवळ गेला आणि तिच्याशी तुटक इंग्रजी भाषेत बोलू लागला.

या युवकाचे नाव पृथ्वी असून त्याने केनेडीला हॉटेलमध्ये राहण्याची पुर्ण व्यवस्था केली होती. त्यांनतर पृथ्वीने तिला तेथील पर्यटन स्थळांची देखील माहिती दिली. यानंतर पृथ्वीने केनेडी सोबत अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यादरम्यान त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि यातच केनेडी पृथ्वीच्या प्रेमात पडली. एवढेच नव्हे तर तिने पृथ्वीला थेट लग्नाची मागणी घातली.

हे ऐकून खरेतर पृथ्वीला धक्काच बसला होता. कारण, पृथ्वी हा केवळ 12 वी शिकलेला मुलगा होता आणि त्याला इंग्रजी देखील नीट समजत नव्हते. तसेच ते दोघेही वेगवेगळ्या देशांचे आणि वेगवेगळया राहणीमानाचे होते. परंतू, हळूहळू जसजसा त्यांच्यातला संवाद वाढू लागला तसतसे ते एकमेकांना आणखी समजून घेऊ लागले.

यानंतर त्या दोघांनी ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. “संपूर्ण जगात भारतीय पुरुष हे प्रामाणिक पती म्हणून ओळखले जातात. माझा पृथ्वीशी लग्न करण्याचा निर्णय अगदी योग्य आहे. पृथ्वीबरोबर राहून मी खूप खुश आहे,” असे केनेडी म्हणते. त्या दोघांनी ही लग्न केले आणि आता सुखी संसार करत आहेत. केनेडी हळुहळू येथील चालीरीती व परंपरा शिकत आहे.

पृथ्वी सिंह हा हिमाचल प्रदेशमधील चंबा गावात तिवारी येथे राहतो. तो एका गरीब कुटंबातील मुलगा आहे. तो एका हॉटेलमध्ये काम करतो तसेच तो शाळेत मुलांना ज्युडो-कराटे शिकवण्याचे देखील काम करतो. त्यांची ही अनोखी ‘लव्ह स्टोरी’ सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page