मैत्रिणीसोबत शाळेतून परतत असताना अंगावर वीज प’डू’न मुलीचा झाला दु’र्दै’वी अं’त..

आजकाल सुरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान होताना दिसत आहे. मुंबई सारख्या शहरात या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी भरत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजा पडून झाडे उन्मळून पडत आहेत. मोठ्या प्रमाणत नुकसान होताना दिसत आहे. नुकताच असा एक प्रकार धर्माबाद येथून समोर आला आहे.

धर्माबाद येथील रहिवासी असलेली 15 वर्षीय स्वाती कामाजी आवरे ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती. चार वाजताच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणी सोबत शाळेतून घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात होती. तेव्हा मुसळधार पाऊस कोसळत होता तसेच विजांचा देखील प्रचंड कडकडाट होत होता.

त्या दोघी मैत्रिणी रस्त्यावरून जात असताना अचानक विजांचा कडकडाट झाला आणि वीज थेट स्वाती हिच्या अंगावर प’ड’ली. अंगावर विज पडल्यामुळे स्वातीचा जागीच मृ’त्यु झाला. तिच्या सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीला मात्र कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वातीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page