चॅटिंग करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले, लग्न करण्यासाठी पळून गेले पण होणाऱ्या नवऱ्याचा पगार ऐकून मुलीने..

दररोज सो’श’ल मी’डि’या’व’र आपल्याला अनेक प्रकारच्या घडामोडींची माहिती मिळत असते. तसेच मनोरंजन देखील होत असते. काही गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात. अशीच एक घटना आज आपण पाहणार आहोत.

राजस्थानमधील धौलपूर येथे राहणारा 17 वर्षीय मुलगा आणि उत्तर प्रदेश येथील आग्रा जिल्ह्यात राहणारी 16 वर्षीय मुलगी या दोघांची फे’स’बु’क’च्या माध्यमातून मैत्री झाली. हळुहळू त्यांची मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शेवटी त्यांनी एकमेकांशी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले.

लग्न करण्यासाठी मुलगी घरातून पळून मुलाच्या गावी म्हणजेच धौलपुर येथे गेली. घरून पळून असल्याच्या संशयातून या दोघांना धौलपुर रेल्वे स्थानकातून पकडले आणि बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले.

बालकल्याण समितीमधील सदस्यांनी या दोघांची विचारपूस केली असता, आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो, असे त्यांनी सांगितले. बालकल्याण समितीच्या सदस्यांनी त्या दोघांना त्यांच्या घरच्यांचे मोबाईल नंबर तसेच घरचा पत्ता विचरला. चौकशी करून त्यांच्या कुटंबीयांना या बद्दलची माहिती देण्यात आली.

मुलगा फक्त 1400 रुपये कमवतो हे समजल्यानंतर मुलीने प्रियकराला लग्नाला नकार दिला, असे चौकशी दरम्यान सांगण्यात आले आहे. मुलीच्या कुटंबीयांना देखील धौलपूर येथे बोलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page