मुलांचे भविष्य हे कॉन्व्हेंट शाळेत शिकूनच चांगले होते असा अनेकांचा असणारा गैरसमज या IAS अधिकारी आई-वडिलांनी दूर केला..

IAS अधिकारी स्वाती आणि नितीन भदौरिया हे उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. गोरखपूर येथे राहणाऱ्या स्वाती यांचे आईएएस अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. स्वाती यांचे गोरखपूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांनी लखनऊ आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर पुढे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरूवात केली.

परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत केली. परंतु पहिल्याच प्रयत्नात केवळ एका नंबरमुळे त्या अपयशी ठरल्या. मात्र, तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. 2012 मध्ये त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपले स्वप्न साकार केले.

प्रशिक्षणानंतर त्या छत्तीसगड केडरच्या त्या आईएएस अधिकारी बनल्या. त्या पुढे सराईपाली आणि डोंगरगावच्या एसडीएम म्हणून कार्यरत होत्या. स्वाती भदौरिया या त्यांच्या साधेपणामुळे आणि कौशल्यामुळे एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून नेहमी चर्चेत असतात. त्यांनतर त्यांनी नितीन भदौरिया यांच्याशी विवाह केला.

नितीन भदौरिया हे 2011 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते उत्तराखंड येथे आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत. लग्नानंतर दोघेही उत्तराखंडमध्ये राहतात. पुढे स्वाती यांनी आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी कॉन्व्हेंट शाळा न निवडता सरकारी शाळा निवडली. त्या अंगणवाडी मध्ये आपल्या मुलाचा प्रवेश घेण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

आपल्या मुलाने कॉन्व्हेंट शाळेत शिकावे असे अनेक पालकांची इच्छा असते. परंतु सरकारी शाळेत मुलाने जावे असे कोणालाच वाटत नाही. पण आईएएस अधिकारी स्वाती आणि नितीन भदौरिया यांनी आपल्या मुलाला कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश न घेता त्यांनी त्यांच्या मुलाचा प्रवेश सरकारी अंगणवाडी मध्ये घेतला. खरच हे दोघं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page