भावुक करणारा क्षण! श’ही’द जवानाच्या बहिणीच्या लग्नात हजेरी राहून जवानांनी पार पाडले भावाचे कर्तव्य..

भारतीय सैन्यात भरती होणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. अनेक वीर पुत्रांनी देशासाठी ब’लि’दा’न दिलेले आपण पाहिले आहे. अनेक जवान देशसेवा करताना श’ही’द झालेले देखील आपण पाहिले आहेत. देशाच्या रक्षणासाठी जवान आपल्या कुटुंबापासून लांब राहतात. रक्षण करणारा प्रत्येक जवान हा वेगळा असतो तरीदेखील हे जवान एकत्रित येऊन देशसेवा करतात. त्यांच्या एकजुटीचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत.

उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथील रहिवासी असलेले शैलेंद्र प्रताप सिंह हे 2008 मध्ये सीआरपीएफ मध्ये रुजू झाले होते. ते सीआरपीएफच्या 110 व्या बटालियनमध्ये तैनात होते. जम्मू-काश्मीर येथे 5 ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या ह’ल्ल्या’त कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंह हे लढताना श’ही’द झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, तीन बहिणी, त्यांची पत्नी आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

श’ही’द शैलेंद्र सिंह यांच्या तीन बहिणींपैकी दोन बहिणी शैलेंद्र सिंह देशसेवेमध्ये रुजू होण्याआधी विवाहित होत्या. फक्त त्यांची लहान बहीण ज्योती यांचे लग्न व्हायचे होते. मागील काही दिवसांपूर्वी रायबरेली येथे श’ही’द शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या बहिणीचे लग्न होते.

शैलेंद्र प्रताप सिंह यांचे सहकारी जवान या लग्नात उपस्थित राहून त्यांनी श’ही’द शैलेंद्र सिंह यांचे मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले. या जवानांनी बहिणीला शैलेंद्र याची कमी भासून दिली नाही. त्यांनी जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांना भेटवस्तू देखील दिली.

या जवानांनी ज्योती यांच्या लग्नाला लावलेली हजेरी पाहून सगळेच जण भावूक झाले होते. तसेच त्यांचे कौतुक देखील केले. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या जवानांनी आपल्या श’ही’द जवानाच्या बहिणीच्या लग्नाला लावलेली हजेरी पाहून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page