एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर भावाने दिली प्रेरणा, कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली UPSC परिक्षा..

UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे हे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते. बहुतेक इच्छुक उमेदवार हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असतात. ही परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यांना कठोर मेहनत घ्यावी लागते. चांगल्या अभ्यासासाठी कोचिंगचा आधार घ्यावा लागतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत एका महिला अधिकारीबद्दल ज्यांनी कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

आर्तिका शुक्ला ह्या उत्तर प्रदेशामधील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील ब्रिजेश शुक्ला हे पेशाने डॉक्टर आहेत तसेच आई लीना शुक्ला या गृहिणी आहेत. अर्तिका यांना गौरव शुक्ला आणि उत्कर्ष शुक्ला हे दोन मोठे भाऊ आहेत आणि दोघांनीही युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा मोठा भाऊ गौरव शुक्ला यांनी 2012 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच उत्कर्ष शुक्ला हे युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IRTS अधिकारी बनले.

आर्तिका यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉन स्कूलमधून पूर्ण झाले. त्या लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या. आपल्या वडीलांप्रमाने त्यांनाही डॉक्टर होण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपले पुढील शिक्षण मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आणि त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली. पुढे आर्तिका यांनी पीजीआयएमईआरमधून आपले एमडी शिक्षण पूर्ण केले.

यादरम्यान त्यांचा मोठा भाऊ गौरव यांनी त्यांना युपीएससी परीक्षा देण्याचे सुचवले. भावाने सांगितलेल्या या गोष्टीचा त्यांनी विचार केला आणि युपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपले एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून परीक्षेची तयारी करण्यास सुरूवात केली.

यासाठी त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही. मात्र, त्यांना त्यांच्या दोन्ही भावांनी परीक्षेच्या तयारीसाठी चांगली मदत केली. यामुळे त्यांना अभ्यास करताना कोणत्याही अडचणी आल्या नाही. त्यांनी शालेय पुस्तकांचा अभ्यास केला तसेच त्यांनी चालू घडामोडींवर देखील चांगले लक्ष केंद्रित केले. यामुळे त्यांना खूप फायदा झाला असे त्या सांगतात.

अखेर 2015 मध्ये आर्तिका यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून यशाला गवसणी घातली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात चौथा क्रमांक पटकावला आणि त्यांची आयएएस पदासाठी नियुक्ती करण्यात आली. आर्तिका यांनी केवळ एका वर्षाच्या कठोर परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. यामुळे अनेक उमेदवार त्यांची कहाणी ऐकून प्रेरित होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page