बहिणीसाठी स्कूटी खरेदी करायला शोरूम मध्ये गेला भाऊ, शोरूमच्या कर्मचाऱ्यांना दिली तब्बल 62 हजारांची चिल्लर

भाऊ-बहिणीचे नाते म्हणजे निखळ प्रेमाचा झरा आहे. कितीही रुसवे फुगवे असेल तरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ नेहमी आपल्या बहिणीची आपल्या वडिलांप्रमाणे काळजी घेत असतो. नेहमी तिचे रक्षण करत असतो. बहिणीला पाहिजे त्या गोष्टी आणून देतो. आज आपण अशाच एका भावाचे आपल्या बहिणीवर असलेल्या अनोख्या प्रेमाबद्दल जाणून घेणार आहोत.

जयपूर मधील रहिवासी असलेल्या 13 वर्षीय यशला दिवाळी सणानिमित्त त्याच्या बहिणीसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची होती. दिवाळीचा सण आला की बहुतेक लोक वाहन खरेदी करतात. हे यश ने पाहिले होते. म्हणून त्याला ही आपल्या बहिणीसाठी वाहन खरेदी करण्याची इच्छा होती.

यश ने त्याच्या बहिणीसाठी स्कूटर खरेदी करण्याचे ठरवले. त्याने बचत करून ठेवलेले पैसे घेऊन तो शोरुम मध्ये गेला. यश जवळ नाण्यांच्या दोन पिशव्या पाहून तेथील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. एवढी नाणी पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्याला स्कूटर देण्यास नकार दिला.

त्यांनी ही नाणी मिळालेल्या पॉकेटमनी मधून जमा केलेली होती. बऱ्याचदा त्यांना पॉकेटमनी म्हणून नोटा ही मिळायच्या परंतु त्या खर्च होऊन जातील म्हणून ते नोटांचे नाण्यात बदलून घ्याचे आणि ते गल्ल्यात टाकायचे. अशी या भावाची खरी कहाणी समजल्यानंतर त्याला स्कूटर देण्यास त्यांनी होकार दिला.

त्यांनी आणलेली 62,000 रुपयांची नाणी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल अडीच तास लागले. भावाचे आपल्या बहिणीवर असलेले हे अभूतपूर्व प्रेम पाहून तेथील सगळे भावूक झाले होते. आपल्या बचतीमधून बहिणीला एवढी सुंदर भेटवस्तू देणाऱ्या या भावाचे अनेकांनी कौतुक केले.

गाडी मिळाल्यावर बहिणीला खूप आनंद झाला हे वेगळे सांगायला नको. साहजिकच, तिला तिचा उत्साह आवरता आला नाही, “सकाळची नियमित वेळ होती. मी उठले आणि माझ्या भावाने मला त्याच्यासोबत यायला सांगितले. पण पुढे जे घडले ते चकित करणारे होते. मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही.

होय, मी माझ्या आई-वडिलांना मला एक स्कूटर विकत घेण्यास सांगितले होते, पण यश त्याच्या सर्व बचतीचा वापर करून मला एक स्कूटर विकत घेईल याची मी कल्पनाही केली नव्हती. मी भारावून गेले. मी त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले,” रुपल म्हणते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page