24 दिवसांच्या बाळाला हातात घेऊन कामावर परतल्या होत्या या महिला IAS अधिकारी..

स्त्रीची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कार्य चोख पार पाडताना दिसत आहे. दररोज स्त्री वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळून अनेक नातेसंबंध जपत असते. स्त्री मुळेच आपल्याला हे विश्व पाहण्याची संधी मिळते. मात्र, यासाठी स्त्रीला खूप यातना सहन कराव्या लागत असतात. परंतु तिचा हा अनुभव खूप आनंद देणारा असतो. आज आपण अशाच एका कर्तव्यदक्ष आईबद्दल जाणून घेणार आहोत.

सौम्या पांडे या मूळच्या प्रयागराज मधील असून, 2017 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. देशातील प्रतिष्ठित महाविद्यालय मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी आपले बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान त्यांनी सुवर्णपदक देखील मिळवले होते.

त्यानंतर त्यांनी युपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कठोर परिश्रम आणि मेहनत करून पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी या परीक्षेमध्ये प्रथम दहा मध्ये स्थान मिळविले आणि त्यांना आयएएस अधिकारी म्हणून निक्युत करण्यात आले.

सध्या त्या कानपुर येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. सौम्या पांडे यांनी मागील दोन वर्षांच्या कठीण काळातही आपले कर्तव्य बजावले आहे. यादरम्यानच त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

मुलीला जन्म दिल्यानंतर सौम्या या अवघ्या 22 दिवसांत पुन्हा कामावर रुजू झाल्या आणि आपल्या कामाचा पदभार स्वीकारला. मुलीला सांभाळण्याचा प्रश्न त्यांच्या समोर होता. परंतु त्यांना आपल्या कुटुंबासोबत देशाची सेवा करणे हे देखील महत्वाचे होते. यासाठी त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला.

मुलीला मांडीवर घेऊन आपले कार्य बजावत असतानाचा सौम्या पांडे यांचा फोटो सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलाच व्हायरल झाला होता. आपले वैयक्तिक कर्तव्य पार पाडत असताना त्या देशाची सेवा सुद्धा चोखपणे पार पाडत आहेत. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्या अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page