अमेरिकन मुलगी झाली भारताची सुन, चांगली नोकरी सोडून भारतात येऊन केले 12 वी शिकलेल्या कौशिकसोबत लग्न

सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमामुळे अनेक लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. जगातील कुठल्याही भागात असलेल्या लोकांशी संपर्क साधने सहज शक्य झाले आहे. आज आपण अशीच एक कहणी पाहणार आहोत. दिल्ली सीमेवरील हरियाणाच्या एका छोट्याश्या गावात राहणारा कौशिक हा एका शेतकरी कुटुंबातील आहे.

कौशिकने आपले 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने फे’स’बु’क वर मरीन टॅप्स या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मरीन टॅप्स ने कौशिकने फे’स’बु’क वर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली होती. मरीन टॅप्स ही अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहत होती. ती 44 वर्षांची असून ती न्यूयॉर्कमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होती. तिचे वडील पेंटर म्हणून काम करत होते.

जसजसे हळूहळू हे दोघे एकमेकांशी बोलू लागले तसतसे या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे जानेवारी 2016 मध्ये त्याने मरीन टॅप्सला लग्नासाठी मागणी घातली. मरीन टॅप्स लग्नाला होकार देईल असे कौशिकला अजिबात वाटत नव्हते, मात्र, नवलच झाले आणि ती लग्नाला चक्क हो म्हणाली.

तिच्या कुटुंबामधून या लग्नाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नव्हता, म्हणून तिने कौशिकला लग्नासाठी होकार दिला, असे ती म्हणाली. पुढे त्यांच्यात बोलणी होऊन ती कौशिकसोबत लग्न करण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडून भारतात आली. आर्य समाजातील मंदिरात 4 जून 2016 रोजी मरीन टॅप्स आणि कौशिक हे दोघे लग्नबंधनात अडकले.

त्यांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि काही गावकरी देखील उपस्थित होते. अमेरिकन सुन भेटल्यामुळे सगळे खूप खुश होते. मरीन टॅप्स ही देखील कौशिक सोबत खूप आनंदात आहे. आता ती हळूहळू हिंदी बोलण्यास शिकली आहे. तसेच ती भारतीय पद्धतीचे जेवण बनवायला देखील शिकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page