बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईचा संघर्षमय प्रवास, आपल्या लहान बाळाला मांडीवर घेऊन चालवते ई-रिक्षा..

जगातील प्रत्येक आई आपल्या मुलासाठी धडपडत असते. आई एवढे सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येही नाही. आज आपण अशाच एका सामर्थ्यवान आईविषयी जाणून घेणार आहोत. नोएडामध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय चंचल शर्मा यांचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून 10 वीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांनतर त्यांचे लग्न झाले.

परंतु त्या सध्या आपल्या पतीपासून विभक्त होऊन राहत आहेत. त्यांना एक लहान बाळ आहे. ते त्या बाळाला घेवून आपल्या आईकडे राहतात. त्यांना एक भाऊ आणि तीन विवाहित बहिणी आहेत. त्यांची आई कांदा विक्रीचे काम करते. मागील वर्षी त्यांचा मुलगा अंकुश दीड महिन्यांचा झाल्यानंतर चंचल यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली.

आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आपल्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांना नोकरी करायची होती. त्यांनतर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या आता ई-रिक्षा चालवत आहेत. नोएडामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल ते लेबर चौक यादरम्यान चंचल या त्यांची ई-रिक्षा चालवतात. त्या 6.5 किमीच्या अंतरात आपली ई-रिक्षा चालवतात. जे काम पुरुष करतात ते काम चंचल करत आहेत. त्या ज्या परिसरात ई-रिक्षा चालवतात तिथे फक्त त्या एकमेव महिला चालक आहेत.

चंचल या एकमेव महिला रिक्षा चालक असल्या तरीही त्यांनी कधीही माघार घेतली नाही. ई-रिक्षा चालवत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा भाऊ फारसा घरी नसतो आणि त्यांच्या आई कांदा विकतात त्यामुळे त्यांना ही घरी राहणे शक्य नसते. तसेच पाळणाघरामध्ये अंकुशला ठेवणे त्यांना परवडणार नाही. त्यामुळे अंकुशला त्या सोबत घेऊन ई-रिक्षा चालवतात.

चंचल यांचा दिवस सकाळी साडे सहा वाजता सुरू होतो. साडे सहा वाजले की ते आपली रिक्षा काढतात आणि आपल्या मुलाला घेऊन निघतात. अंकुशला बेबी बेल्टमध्ये बांधून त्याला मांडीवर घेवून त्या आपली ई-रिक्षा चालवत असतात. त्यानंतर दुपारी अंकुशला आंघोळ घालण्यासाठी परत घरी येतात. घरी आल्यानंतर जेवण करून त्या पुन्हा आपली रिक्षा घेऊन जातात. जर कधी अंकुशला भूक लागली तर त्यासाठी दुधाची बाटली देखील त्या त्यांच्यासोबत ठेवतात.

गर्दीमध्ये अंकुशला सोबत घेवून रिक्षा चालवणे फार कठीण जाते. गर्दीमुळे तो कधी कधी खूप रडतो. तसेच उन्हाळा असला की त्याला त्याचा जास्त त्रास होतो, असे चंचल सांगतात. परंतु त्यांना आपल्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी हे काम करायचे आहे, असे त्या म्हणाल्या. अनेक समस्यांना तोंड देत चंचल आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी धडपडत आहेत. मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.

चंचल शर्मा या आपले आयुष्य रोज संघर्ष करून जगत आहेत. त्यांच्या ई-रिक्षा मध्ये बसलेले सगळे प्रवाशी त्यांचे खूप कौतुक करतात. सध्या त्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील व्हायरल होत आहेत. त्यांच्या या संघर्षाची सध्या ‘सो’श’ल मी’डि’या’व’र खूप चर्चा सुरू आहे. अनेक महिलांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page