दृष्टी हरवली पण हिम्मत नाही, संघर्ष करून गोपाल कृष्ण बनले IAS अधिकारी..

गोपाल कृष्ण हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील एक शेतकरी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण झाले. त्यांना शिक्षण पूर्ण करताना खूप आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. गोपाळ कृष्ण तिवारी यांना लहापणापासूनच थोडे कमी कमी दिसत होते. पण कालांतराने त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली.

परंतु या गोष्टीने त्यांना कधी वाईट वाटले नाही, तर या उलट त्यांच्यात जगण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा वाढत गेली. त्यामुळे त्यांनी युपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या संघर्षाचा लढा चालूच ठेवला. ते वाचायचे आणि ते ऐकून तयारी करायचे.

त्यानंतर त्यांनी टेपरेकॉर्डरच्या मदतीने चांगली तयारी केली आणि त्यांनी असे काही करून दाखवले की त्यांच्या कुटुंबाला आयुष्यभर त्यांचा अभिमान वाटेल. गोपाल कृष्ण तिवारी यांची 17 नोव्हेंबर 2008 रोजी आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते देशातील पहिले दृ’ष्टि’ही’न जिल्हाधिकारी बनले. जे सामान्य माणसासाठीही आव्हानात्मक असते असे त्यांनी करून दाखवले.

युपीएससी परीक्षेत त्यांनी दि’व्यां’ग श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ते आयएएस अधिकारी बनले. यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी लाल बहादूर प्रशासकीय अकादमी डेहराडून मधून प्रशिक्षण घेतले त्यांनतर त्यांनी मध्य प्रदेश केडरमध्ये प्रवेश केला. त्यांची पहिली पोस्टिंग भोपाळमध्ये एसडीएम म्हणून झाली.

कोणतेही काम अशक्य नसते. आपण जिद्दीने आपले ध्येय गाठू शकतो. हे आयएएस अधिकारी गोपाल कृष्ण तिवारी यांनी सिध्द करून दाखवले आहे. त्यांचा हा संघर्षमय  प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page