वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी पुण्याचा ‘या’ महिलेने, फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंताच्या यादीत आपले स्थान पटकावले..

आपल्याकडे बक्कळ पैसा असावा अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींची नाही. खूप मेहनत तसेच ध्येय साध्य करण्याची जिद्दी आणि चिकाटी या गोष्टींच्या आधारे आपल्याला आपले यश गाठायचे असते. तेव्हाच आपले समाजात स्थान निर्माण होते. आज आपण अशाच एका स्वबळावर समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत.

नेहा नारखेडे या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामधूनच पूर्ण झाले आहे. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून त्यांनी 2006 मध्ये आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्या कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया मध्ये गेल्या. तेव्हा त्यांनी अमेरिकेमध्येच स्थलांतर केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा यांनी ओरॅकल मध्ये आणि नंतर लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. त्यांना नेहमीच वेगळे काहीतरी करण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच त्यांनी लिंक्डइन येथील काही सहकाऱ्यांच्या मदतीने 2014 मध्ये कॉन्फ्लुएंट या नव्या कंपनीची स्थापना केली. तेथे त्यांनी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम केले. आता त्या कंपनीच्या सह-संस्थापक आणि संचालक मंडळ म्हणून काम करत आहेत.

नेहा गेले 15 वर्ष अमेरिकेमध्ये राहत आहेत. मागील वर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंताच्या यादीत नेहा 29 व्या स्थानावर होत्या. 2017 मध्ये एमआयटी टेक्नॉलॉजीने 35 वयाच्या आतील नवकल्पनाकार हा पुरस्कार नेहा यांना बहाल केला होता. फोर्ब्सने यंदा जाहीर केलेल्या यादीत अमेरीकन सेल्फ मेड महिला उद्योजक म्हणून नेहा यांचा 57 वा क्रमांक होता.

अवघ्या 37 वर्षाच्या वयात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या नेहा या कदाचित भारतामधील पहिल्याच सर्वात तरुण आणि स्वयंनिर्मित महिला उद्योजिका आहेत. नेहा यांची संपत्ती चार हजार सातशे कोटी रुपये आहे. तसेच आयआयएफएल वेल्थ इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये त्या 336 व्या क्रमांकावर आहेत. नेहा यांचा आपल्या स्वबळावरचा हा प्रवास खरच थक्क करून टाकणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page