बँकेचा हलगर्जीपणा पडला महागात, नोटा ठेवलेल्या बॉक्समध्ये पाणी शिरल्याने तब्बल 42 लाखांचा झाला लगदा..

आपले पैसे तसेच आपले दागिने नेहमी सुरक्षित राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळेच बँक उदयास आल्या आहेत. बँकेमुळे आपण आपला पैसा आणि दागिने सुरक्षित ठेवू शकतो. बँकेवरती विश्वास ठेवून लोक बँकेत आपली आयुष्याची जमा पुंजी ठेवत असतात. पण खरच बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? आजचा लेख वाचून तुम्हालाही हा प्रश्न पडेल.

कानपूर येथील पांडू नगरमध्ये असलेल्या PNB बँकेच्या एका शाखेत तीन महिन्यांपूर्वी एका बॉक्समध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा भरून ठेवण्यात आल्या होत्या कारण बँकेच्या तिजोरीमध्ये नोटा ठेवायला जागा शिल्लक नव्हती.

मात्र, या खोक्यात पावसाचे पाणी शिरल्याने यातील काही नोटांचा लगदा झाला आहे आणि याची खबर ही कुणाला लागली नाही. बँक कर्मचारी अधून मधून या नोटा पाहायचे पण ते वरवरचं त्यामुळे त्या नीटच असल्याचे नेहमी त्यांना दिसायचे. परंतु पावसामुळे खालून बॉक्सच्या आत पाणी शिरल्याने ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही.

या घडलेल्या घ’टनेनंतर आरबीआयचे काही अधिकाऱ्यांची टीम निरीक्षणासाठी बँकेत आली होती. तेव्हा या टीमने बँकेची पाहणी केली असता बॉक्समधील झालेला नोटांचा लगदा पाहून या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकारचा अहवाल पाठवला.

त्यामुळे पुढे बँकेच्या व्हिजिलन्स टीमने येवून या सगळ्या प्रकाराची नीट चौकशी सुरू केली. बँकेत असलेल्या नोटा सुरक्षित का ठेवल्या नाहीत असा सवालही त्यांना विचारला गेला. केलेल्या या हलगर्जीमुळे या बँकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यामधे वरिष्ठ प्रबंधक भास्कर कुमार भार्गव, नुकतेच 25 जुलै रोजी पांडू नगर या शाखेचा पदभार स्वीकारकेले वरिष्ठ प्रबंधक देवीशंकर आणि चेस्ट ऑफिसर राकेश कुमार तसेच प्रबंधक आसारम यांचा समावेश आहे.

या सर्व घटनेबाबत पंजाब नॅशनल बँकेने कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. तसेच या प्रकराला दुसरे कोणते वळणही दिलेले नाही. या सर्व घटनेवरून बँकेमधील ठेवलेल्या रक्कमेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page