बराच वेळ झाला तरी पाणी आणायला गेलेली मुलगी परतली नाही म्हणून शोधाशोध केली तर..

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील चिचाळ या गावात राहणारी 16 वर्षीय सलोनी विनोद नखाते ही विद्यार्थिनी चिचाळ जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहाविमध्ये शिकत होती. सलोनीचे वडील विनोद नखाते आणि आई संगीता नखाते हे दोघेही शेतावर शेळ्या घेऊन गेले होते.

तर सलोनी आपली सकाळची शाळा सुटल्यानंतर शेतात असलेल्या आईवडिलांकडे गेली. शेतात गेल्यानंतर आईने सलोनीला शेळ्यांसाठी पाणी आणायला सांगितले. त्यांनतर सलोनी पाणी आणण्यासाठी शेताच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या विहिरीवर गेली.

सलोनी बराच वेळ झाला तरी अद्याप परतली नाही म्हणून आईला चिंता वाटू लागली. त्यांनी आणखी थोडा वेळ वाट पाहिली तरीही ती आली नाही त्यामुळे त्या लगेचच विहिरीजवळ गेल्या. तेव्हा विहिरीजवळ सलोनीच्या चपला त्यांना दिसल्या.

मुलगी विहिरीत प’डल्याचा त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. संगीता यांचा आवाज ऐकून विनोद यांनी देखील तातडीने विहिरीकडे धाव घेतली. त्या दोघांनी ही विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना पाण्यात सलोनी दिसली नाही.

त्यावेळेस त्यांनी लगचेच गावकऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने पाण्यात शोध घेण्यास सांगितले. यादरम्यान सलोनी पाण्यात बु’डा’ली असल्याचे समोर आले. सलोनीचा मृ’त’दे’ह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

सलोनीचा मृ’त’दे’ह अड्याळ ग्रामीण रुग्णालयात श’व’वि’च्छे’द’ना’साठी पाठवण्यात आला. विहिरीतून पाणी काढत असताना सलोनीचा अचानक पाय घसरला आणि तीचा तोल जाऊन ती विहिरीत पडली होती.

यानंतर या घटनेची माहिती अड्याळ पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यांनतर अड्याळ पोलिसांनी सलोनीच्या मृ’त्यु’ची नोंद केली. 16 वर्षीय सलोनीच्या आकस्मित मृ’त्यू’ने सलोनीच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page