आई कारखान्यात मजूरीचे काम करत असे, मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले..

परिस्थिती कशीही असली तरी, आपल्याजवळ जर जिद्द असेल आणि दृढ आत्मविश्वास असेल तर प्रत्येकजण आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकतो. असाच काहीसा प्रकार निजामाबाद जिल्ह्यातील नंदवाडा येथे राहणाऱ्या हरिकाच्या बाबतीत घडला आहे.

हरिकाने यूट्यूब व्हिडिओच्या मदतीने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली. तिची आई कारखान्यात मजूरीचे काम करत असे. हरिकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि स्वतःला झोकून देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पहिलेच नाही तर ते पूर्ण देखील करून दाखवले आहे.

निजामाबाद जिल्ह्यातील नंदवाडा येथील रहिवासी असलेली हरिका ही लहान असतानाच तिचे वडील शिवकुमार यांचे दुःखद नि’ध’न झाले. त्यांनतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हरिकाच्या आईने एका कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. आईने भरपूर कष्ट करून हरिकाचे शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत हरिकाने देखील घवघवीत यश मिळवले आहे.

हरीका लहानपणासूनच हुशार होती. तिने राज्य स्तरावर 700 वा रँक मिळवला आहे. इंटरमिजिएटमध्ये चांगले मार्क्स मिळवल्यानंतर हरिकाने डॉक्टर होण्याचे ध्येय आपल्यासमोर ठेवले. हरिकाने एमबीबीएसची परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तिचे कौतुक करण्यासाठी टीआरएस एमएलसी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या कविता कलवकुंतला यांनी हरिका आणि तिच्या आईची भेट घेतली होती. कविता यांनी हरिकाला भेटल्याचे फोटोही सो’श’ल मी’डि’या’व’र पोस्ट केले आहेत.

एमएलसी कविता यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हरिका ही प्रत्येकासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. यूट्यूब व्हिडिओ बघून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करून तिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिच्या हा घवघवीत यशानंतर मी हरिकाला आणि तिच्या आईची भेट घेतली आणि तिच्या फीचा पहिला हप्ता देऊन तिच्या स्वप्नांना थोडासा आधार देण्याचे काम केले आहे.

हरिका अनेक तरुणांसाठी आज एक प्रेरणास्थान बनली आहे. तिने मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे. तिला तिच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page