बायकोला धड साडी नेसता येत नाही आणि स्वयंपाक जमत नाही म्हणून तरुणाने आयुष्य संपवले

अनेकदा नवरा-बायकोमध्ये काही गोष्टींवरून छोटे-मोठे खटके उडत असतात. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचं असे नेहेमीच म्हटले जाते. परंतु औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल.

बायकोला नीट साडी घालता येत नाही म्हणून एका 24 वर्षीय तरुणाने आपले आयुष्य संपवले आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील आहे. 24 वर्षीय तरुणाने व्हाट्सएपवर आय क्विट असे स्टेटस लिहून ग’ळ’फा’स लावून घेतला आहे.

अजय साबळे असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने म’र’ण्या’आधी लिहले की, “माझ्या बायकोला नीट साडी नेसता येत नाही, तिला धड स्वयंपाक देखील बनवता येत नाही, आम्ही कुठे बाहेर जेवायला गेलो तर तिकडे देखील विचित्र वागते आणि सरळ प्लेट उचलून ठेवते. ती माझ्याहून 5 वर्षाने मोठी आहे.”

औरंगाबाद येथे राहणारा अजय या तेथील परिसरात प्लबिंगचे काम करत होता. 4- 5 महिन्यापूर्वीच त्याने लग्न केले होते. परंतु या लग्नाने तो आनंदी नव्हता. तो सतत नै’रा’श्या’त असायचा.

याचाच परिणाम म्हणून तो व्हाट्सएपवर देखील नेहमी निराशाजनक स्टेटस ठेवायचा. याबाबत त्याच्या मित्रांनी देखील त्याला अनेकदा विचारपूस केली, परंतु तो यावर काही बोलला नाही. शेवटी त्याने रविवारी हे टो’का’चे पाऊल उचलले.

त्या दिवशी रात्री तो घरावरील खोलीत झोपायला गेला होता. रात्री त्याचे स्टेटस बघून जेव्हा त्याचा मित्र त्याला भेटायला आला तेव्हा या प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत त्याने आपले आयुष्य सं’प’व’ले होते. त्याच्या खोलीत त्याने लिहीलेली चिठ्ठी आढळून आली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास चालू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page