भाजी विकणाऱ्या बापाच्या मुलींची गगनभरारी! दोन बहिणींनी एकत्र इन्स्पेक्टर बनून वडिलांची मान अभिमानाने उंचावली..

जर एखाद्या व्यक्तीने कठोर परिश्रम करण्याचा निर्णय घेतला तर तो सर्वात कठीण आव्हानांवरही मात करून यश मिळवू शकतो. याचाच प्रत्यय देणारी घटना बिहार येथून समोर आली आहे. येथील नवादा जिल्ह्यात राहणाऱ्या दोन बहिणींची पोलीस अंडर सर्व्हिस कमिशनमध्ये निवड करण्यात आली आहे.

नवादा जिल्ह्यात राहणाऱ्या या दोन बहिणींची प्रिया आणि पूजा अशी नावे असून त्यांनी पोलीस सेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण करून संपूर्ण जिल्ह्यात तसेच राज्यात आपले नवीन अस्तित्व तयार केले आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूजा आणि प्रिया यांचे वडील बटाटे आणि कांदे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.

अशा प्रकारे प्रिया आणि पूजा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना कोचिंग क्लासेस लावणे देखील परवडणारे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये देखील या दोघी बहिणींनी एकमेकांच्या मदतीने केवळ परीक्षेची तयारीच केली नाही तर त्यात घवघवीत यश देखील संपादन केले आहे.

प्रियाने दुसऱ्या प्रयत्नात सरकारी परीक्षा उत्तीर्ण केली. तर, पूजा पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाली आहे. या दोन्ही बहिणींनी गरिबी खूप जवळून पाहिली आहे. तसेच अवघड समस्यांना कसे सामोरे जायचे हे या दोघांनाही माहीत आहे. या दोघींनी ही आपल्या परीस्थितीची जाणीव ठेवत यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय त्या आपल्या पालकांना तसेच आपल्या शिक्षकांना देतात.

प्रिया आणि पूजा या दोन्ही मुलींचे यश पाहून त्यांचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. तसेच दोन्ही मुलींचा त्यांच्या पालकांना फार अभिमान वाटत आहे. भाजी विकणाऱ्या बापाच्या मुलींना सरकारी नोकरी मिळणे ही एक फार मोठी गोष्ट आहे. सध्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page