हे कुटुंब आहे जगातील सर्वात उंच भारतीय कुटुंब, कुटुंबातील एकूण लोकांची उंची 26 फुटांपेक्षाही आहे जास्त..

आपण बऱ्याच जणांना त्यांची उंची वाढावी म्हणून अनेक प्रयत्न करताना पाहिले असेल. अनेक पालक नेहमी आपल्या मुलांच्या उंचीबाबत चिंतेत असतात. परंतु आज आपण अशा एका कुटुंबाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची एकूण उंची 26 फुटांपेक्षाही जास्त आहे.

या कुटुंबातील लोकांशी बोलण्यासाठी आपल्या सारख्या सामान्य लोकांना डोके वर करून बोलावे लागते. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व सदस्यांची उंची ही 6 फुटांपेक्षा अधिक आहे. हे कुटुंब पुण्यातील पिंपिरीमधील राहणारे असून या कुटुंबातील कुटुंबप्रमुख शरद कुलकर्णी आहेत. ज्यांची उंची 7 फूट 2 इंच आहे. तर त्याची पत्नी संजोत देखील 6 फूट 2.6 इंच उंच आहे.

या दाम्पत्याने 1989 मध्ये लग्न केले आणि भारतातील सर्वात लांब विवाहित जोडपे बनले. यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. ह्या पती-पत्नीची उंची प्रत्येकालाच आकर्षित करते. एवढेच नाही तर या दामपत्याची मुले देखील उंचीबाबत खूप नशीबवान आहेत. त्यांची उंची देखील नॉर्मल मुलांपेक्षा जास्त आहे.

शरद आणि संजोत कुलकर्णी यांना दोन मुली आहेत आणि त्या देखील आईवडिलांप्रमाणे उंच आहेत. या दाम्पत्याची मोठी मुलगी मुरुगा हीची उंची 6 फूट 1 इंच आहे. तसेच सर्वात लहान मुलगी सान्या हीची उंची 6 फूट 4 इंच आहे. यामुळे ते सध्या देशातील सगळ्यात उंच कुटूंब मानले जाते.

कुलकर्णी कुटुंबाच्या लांब उंचीमुळे त्यांचे नाव लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिले गेले आहे. या कुटुंबाला त्यांच्या लांब उंचीमुळे अनेक फायदे तर होतातच परंतू, ह्याच उंचीमुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो.

आपल्या देशातील नॉर्मल व्यक्तीची उंची जास्तीत-जास्त ६ फूट एवढी मानली जाते. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक वस्तू बनवली जाते. पण या कुटूंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या उंचीनुसार सर्व गोष्टींना हाताळणे खूप अवघड जाते आणि म्हणूनच अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

मात्र, ते आनंदाने आपले जीवन जगत आहेत. कुलकर्णी कुटुंबीय म्हणतात की, जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता तेव्हा लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुमची ओळख जगापर्यंत पोहोचते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page