एसटी बस स्थानकातून काही अज्ञात चक्क बस हेवून गेले, मात्र 2 किमी अंतरावर जाताच..

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील बस स्थानकात रात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास मानव विकास मिशनची बस उभी करून या बसचे चालक आणि वाहक विश्रांती कक्षात विश्रांती घेत होते. याचदरम्यान एका अज्ञातने ही बस चो’रू’न नेली. ही बाब लक्षात येताच बस चालकाने देऊळगाव राजा पोलिसात ठाण्यात बस चो’री झाल्याची त’क्रा’र नोंदवली.

बस स्थानकातून बस चो’री झाल्याचे समजताच एसटी प्रशासनात चांगलाच गोंधळ उडाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनी देखील याचा कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीला गेलेली ही ब’स पोलिसांना सापडली.

ही बस देऊळगाव राजा बस स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर एका गतिरोधकावर उभी होती. या बसचा सेंट्रल जॉईंट निखळला होता त्यामुळे ही बस रस्त्यात उभी करून अज्ञात चो’र’ट्या’ने घटनास्थळावरून पळ काढला होता.

मात्र अद्याप ही बस कोणी आणि कशासाठी पळवली होती याबाबत माहिती मिळाली नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. बस स्थानकातूनच बस चो’री’ला गेल्यामुले परिसरात या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या घटनेने धुमाकुळ घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page