अचानक होत्याचे नव्हते झाले! पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असतानाच अचानक…

पोलीस भरतीची प्रतिक्षा करत असलेल्या तरुणांना अखेर आता संधी मिळत आहे. यासाठी लाखो तरुण मेहनत घेत आहेत. 30 नोव्हेंबर पर्यंत 7 हजार जागांसाठी तरुणांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सगळीकडेच तरुण या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक दु’र्दै’वी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई येथे राहणारा 22 वर्षीय हृतिक मेहेर हा पोलिस भरतीसाठी तयारी करत होता. त्याचे वडील एसटी महामंडळात कामाला आहेत आणि आई भाजी विकायचे काम करते. हृतिक मेहेर याने बीकॉमचे पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न होते.

त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. त्यासाठी त्याने एका अकॅडमी मध्ये देखील प्रवेश घेतला होता. हृतिकच्या आईवडिलांना ही वाटले होते की आपला मुलगा पोलिस बनेल मात्र, तेवढ्यात होत्याचे नव्हते झाले. अचानक नशिबाने हृतिकची साथ सोडली.

त्या दिवशी हृतिक नेहमीप्रमाणे दुपारी 4 वाजताच्या सुमारास धावण्याचा सराव करण्यासाठी रानगाव येथे किनाऱ्यावर गेला होता. परंतु, त्यांनतर हृतिकला धावताना अचानक उलट्यांचा त्रास सुरु झाला आणि तो अचानक खाली कोसळून बे’शु’द्ध झाला, अशी माहिती मिळाली आहे.

5 वाजताच्या सुमारास हृतिक बे’शु’द्ध अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला हृ’दय’वि’का’रा’च्या झटक्याने मृ’त्यु झाल्याचे घोषित केले.

पोलिस भरतीसाठी कठोर मेहनत करत असलेल्या आपल्या मुलाच्या आकस्मित मृ’त्यु’मु’ळे हृतिकच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच नशिबाने त्याची साथ सोडली. त्याच्या या अचानक जाण्याने आजूबाजूच्या परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page