पत्नी सोडून गेल्यामुळे वडील मुलाला सतत टोमणे मारायचे, संतापलेल्या या मुलाने रागाच्या भरात..

आजकालची पिढी मानसिक दृष्ट्या खूप कमजोर झालेली आहे. त्यांना अगदी लहान सहान गोष्टींचा राग पटकन येतो. अशा परिस्थितीमध्ये ते चुकीचे पाऊल उचलतात. याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच अंबरनाथ येथून समोर आली आहे.

अंबरनाथ येथील दत्तकुटीर या परिसरात 60 वर्षीय देविदास सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. देविदास सूर्यवंशी यांचा मुलगा प्रकाश सूर्यवंशी हा रिक्षाचालक आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला तीन मुलं आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याची बायको प्रकाशला सोडून घरातून निघून गेली आहे.

बायको घर सोडून निघून गेल्यामुळे प्रकाशचे वडील देवीदास हे सतत या कारणावरून त्याला नेहमी टोमणे मारत असत. नेहमी त्याला या कारणावरून हिणवत असत. सततच्या टोमण्यांमुळे प्रकाशला या गोष्टीचा खूप मानसिक त्रास होत होता. हा मानसिक त्रास त्याला आता असह्य झाला होता.

याचदरम्यान रविवारी रात्री जेवत असताना देविदास यांनी पुन्हा प्रकाशला घालून पाडून बोलल्यामुळे प्रकाशचा राग अनावर झाला. त्रास सहन न झाल्याने प्रकाशने उठून लाकडी फळीने देविदास यांना खूप मा’र’हा’ण केली.

या मा’र’हा’णी’त देविदास यांचा जागीच दु’र्दै’वी अं’त झाला आहे. या प्रकरणानंतर या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी देविदास सूर्यवंशी यांचा मृ’त’दे’ह श’व’वि’च्छे’द’ना’सा’ठी रूग्णालयात पाठवला.

वडीलांना अशा अमानुष प्रकारे मा’र’ल्या’बद्दल शिवाजीनगर पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‌‌या घटनेनंतर परिसरात देखील एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page