एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या बाजूला व्यायाम करत असलेल्या दोन तरुणांचे हात का’पले गेले..

बुलढाणा जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी मलकापूर-पिंपळगाव येथील देवी मार्गावर सकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे काही तरुण व्यायाम करत होते. तेव्हा या रस्त्यावरून मलकापूर आगाराची बस पिंपळगावदेवी इकडे जात होती.

या बस चालकाच्या केबीनच्या मागच्या बाजूचा पत्रा तुटूला होता आणि तो बाहेर आलेला होता. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला व्यायाम करणाऱ्या तरुणांना हा पत्रा लागल्यामुळे विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील या दोन तरुणांचे हात या पत्र्यामुळे का’प’ले गेले आहेत. हे इतके भी’ष’ण होते की अक्षरशः त्या दोन्ही तरुणांचे हात तुटलेले आहेत आणि ते जवळपास 50 ते 60 फूट अंतरावर जाऊन पडले होते.

त्या दोघांवर आता मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांना त्वरित जळगाव मधील रुग्णालयात दाखल केले आहे, असे सांगितले जात आहे.

अ’प’घा’त घडला तेव्हा चालकाने बस घटनास्थळी थोडा वेळ थांबवली. त्यांनतर त्यांची अवस्था गंभीर असूनही या गंभीर जखमी मुलांना तिथेच सोडून पुढच्या प्रवासाला निघून गेले. ही घटना आसपासच्या गावातील नागरिकांना समजली तेव्हा त्यांनी या दोन्ही तरुणांना मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले.

या भी’ष’ण घटनेमुळे संतप्त झालेल्या जवळपास 200 लोकांनी मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात धाव घेतली. एसटी बस आगारामधून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी न करता कोणतीही पाहणी न करता बस आगाराबाहेर काढलीच का असा प्रश्न संतप्त झालेल्या जमावाने विचाराला.

या संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली आहे आणि बस चालकाला ही ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page