म्हशीने दिला चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकला जन्म, पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली..

आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की, म्हशींचा वर्ण हा काळा असतो आणि तिने जन्माला घातलेल्या बाळाचा ही वर्ण काळाच असतो. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, धाबा गावातील म्हशीने पांढऱ्या शुभ्र रंगाचे रेडकू जन्माला घातले आहे. महाराष्ट्र राज्यातील तेलंगणा येथे असलेल्या धाबा गावात संजय येलमुले यांच्या म्हशीने चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.

16 सप्टेंबरला शुक्रवारी रात्री या पांढऱ्या रंगाच्या रेडकाचा जन्म झाला आहे. हे रेडकू शारीरिकदृष्ट्या ही निरोगी आहे. म्हैस तसे तिचे रेडकू हे आपणा सर्वांना अगदीच परिचयाचे आहे. परंतु काळ्याकुट्ट असलेल्या या म्हशीचे रेडकू एवढे पांढरे शुभ्र कसे हे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. या शुभ्र रंगाच्या रेडकाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

संजय येलमुले यांच्या अजुबाजूच्या परिसरात देखील ही बातमी पसरल्यानंतर हे रेडकू पाहण्यासाठी सगळे येलमुले यांच्या घराजवळ गर्दी करत आहेत. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळपासून या रेडकाने दुध पिलेले नाही. त्यामुळे या रेडकावर खाजगी पशु चिकित्सकाकडे उपचार सूरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

काळयाकुट्ट म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू होते ही घटना दुर्मिळच आहे. संजय येलमुले आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे ते खूप आनंदी आहेत आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर सगळे कुटुंबीय त्याची खूप काळजी ही घेत आहेत. पांढरे शुभ्र असलेले रेडकू सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. अविश्वसनीय अशी ही गोष्ट घडली आहे, त्यामुळे सो’श’ल मी’डि’या’वर ही सध्या हे रेडकू धुमाकूळ घालत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page