दोन कोळी बांधवांना समुद्र किनारी क्वचितच मिळणारा मासा सापडला, किंमत..

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथे असणाऱ्या उत्तन भाटेबंदर समुद्र किनाऱ्यावर दोन कोळी बांधवांना भला मोठा मासा सापडला आहे. हा मासा तब्बल शंभर किलो वजनाचा असून ह्या माश्याला वाघ्या पाकट मासा म्हणून संबोधले जाते. हा मासा समुद्रात क्वचितच सापडतो आणि आता हा समुद्रात दुर्मिळ भेटणारा मासा दोन नाखवांना मिळाला आहे.

सुनील यांची भाटेबंदर किनाऱ्यावर ‘एकवीरा आई’ ही लहान बोट आहे आणि या बोटीच्या मदतीने ते दोघही भांवंडे समुद्र किनारी मासेमारी करत असतात. जिथे पाकाट मासा सापडला. तिथे त्यांना नेहमी शिवंडा हा मासा मिळतो.

मात्र, यावेळेस अचानक या कोळी बांधवांच्या जाळ्यात पाकट मासा सापडला आहे. समुद्र किनारी क्वचितच पाहायला मिळणारा हा मासा जाळ्यात सापडल्याने या दोन्ही भावंडांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या पाकट माश्याचे वजन तब्बल 100 किलो आहे, असे सुनील यांनी सांगितले आहे. या माश्याला बाजारात खूप चांगली मागणी असते. कारण या माश्याचे फायदे देखील अनेक आहेत. या माशाच्या यकृतापासून तेल मिळते. या तेलात अ आणि ड हे जीवनसत्व असतात.

तसेच त्याच्या शरीरापासून मिळालेल्या तेलाचा उपोयोग खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्याच्या का’त’ड्या’चा देखील अनेक प्रकारे उपयोग केला जातो. पाकट माश्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे या माश्याला बाजारात खूप मागणी आहे. बाजारात जाऊन हा मासा विकला तर याची किंमत सुमारे 15 हजार रुपये मिळू शकते, असे सुनील सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page