चालकाने प्रसंगावधान राखून वाचवले 70 प्रवाशांचे प्राण! ठाण्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या एसटी बसला लागली होती आ’ग.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ठाणे आगारातून भिवंडीकडे निघालेल्या एसटी बस मध्ये सुमारे 70 प्रवासी होते. या बसचे चालक आनंद सवारे आणि वाहक गणपत बिराजदार हे होते. ही बस ठाण्याच्या टेंभीनाका या परिसरातील जैन मंदिर जवळ पोहताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट होऊन अचानक आ’ग लागली.

मात्र, सुदैवाने ही बाब बस चालक असलेले आनंद यांच्या त्वरित लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लगेचच प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बस मधील साऱ्याच प्रवशांची बसमधून खाली उतरण्यासाठी धावपळ सुरू झाली. सगळ्यांनाच उतरायची घाई असल्यामुळे बसच्या दरवाजात गर्दी झाली. अशा परिस्थितीमध्ये असताना प्रवाशांनी भीती पोटी बसच्या खिडकीतून बाहेर उड्या मारल्या.

बसच्या स्टार्टरमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट होऊन आ’ग लागली होती. अशी माहिती मिळाली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले त्यामुळे बस मधील सगळे प्रवासी सुखरूप आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे सगळ्यांनी बस चालक आनंद सवारे यांचे आभार मानले आहेत.

ही घटना समजताच माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाला या घटनेची माहिती दिली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि बसच्या स्टार्टरमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट झाल्यामुळे लागलेली आ’ग विझवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page