एकेकाळी घरात पैशाची चणचण होती, मेहनत करून झोपडी ते युरोप असा प्रवास केला..

आपल्या देशातील अनेक स्त्रिया कठोर परिश्रम तसेच आपल्या कर्तृत्वाने, धैर्याने आणि समर्पणाने असे मोठे काम करत आहेत, ज्यामुळे त्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. आज आपण अशीच एक प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत.

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रुमा देवी यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खेताराम आणि त्यांच्या आईचे नाव इमरती देवी होते. त्या अवघ्या पाच वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे नि’ध’न झाले.

रुमा देवी यांना सात बहिणी आणि एक भाऊ आहे. रूमा ह्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्या आपल्या कुटुंबासोबत एका झोपडीमध्ये राहत होते. मोठ कुटूंब असल्यामुळे नेहमीच त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पुढे मुलांच्या संगोपनासाठी त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. परंतु रुमा त्यांच्या मामाकडे राहू लागल्या. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यावेळी गावातील सरकारी शाळेतून त्यांनी आपले आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

यानंतर रुमा देवी यांचा विवाह अवघ्या 17व्या वर्षी बारमेर जिल्ह्यातील मंगल बेरी गावात राहणारे टिकुराम या व्यक्तीशी झाला. रुमा देवी यांचे पती जोधपूरच्या ‘न’शा मुक्ती संस्थान’ मध्ये सहकारी म्हणून नोकरी करतात. या दोघांना लक्ष्य नावाचा मुलगा देखील आहे, तो सध्या शालेय शिक्षण घेत आहे.

रूमा देवी यांचे लहान वयातच लग्न झाल्यामुळे त्यांच्या मनातील सर्व स्वप्ने मागे पडली होती. परंतु त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात होती. बारमेरमधील ग्रामीण विकास आणि चेतना संस्था नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. ज्यांतर्गत राजस्थान राज्यातील हस्तकला उत्पादनांद्वारे महिलांना स्वावलंबी बनवले जाते.

2008 मध्ये रुमा देवी यांनी या संस्थेत प्रवेश घेतला. त्यांनी कठोर मेहनतीने काम करायला सुरुवात केली. त्यांनी हळुहळू नवीन-डिझाइनची हस्तकला उत्पादने तयार केली आणि त्यांनी बनवलेल्या उत्पादनांची बाजारात प्रचंड मागणी वाढू लागली. यामुळे त्यांना काम करण्याची उमेद आणखी वाढली.

यानंतर 2010 मध्ये रुमा देवी यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रुमा देवी या हस्‍तशिल्‍प कलेमध्‍ये साडी, चादर, कुर्ता इत्यादी विविध कपडे तयार करण्‍यात निपुण आहेत. त्यांनी बनवलेल्या कपड्यांना आपल्या देशातच नाही तर परदेशातही प्रचंड मागणी आहे. आज त्यांनी 3 जिल्ह्यांतील सुमारे 75 गावांतील 22 हजार महिलांना रोजगार देत आहेत.

त्यांनी तयार केलेली उत्पादने लंडन, जर्मनी, सिंगापूर आणि कोलंबो येथील फॅशन वीकमध्येही प्रदर्शित करण्यात आली आहेत. आज रुमा देवी हजारो गरीब महिलांना रोजगार देऊन त्यांचे जीवन सुधारत आहेत, मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करावा लागला आहे. रुमा देवी यांचे संपूर्ण बालपण रावतसर मधील झोपडीमध्ये गेले. मात्र, आता त्यांनी बारमेर जिल्ह्यात अनेक घरे बांधली आहेत.

रुमा यांना 2018 मध्ये भारतातील महिलांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान ‘नारी शक्ती पुरस्कार’ बहाल करण्यात आला. रुमा देवी यांना 2020 मध्ये अमेरिकेत आयोजित केलेल्या दोन दिवसीय हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये त्यांचे कार्य प्रदर्शित करण्याची देखील संधी मिळाली होती. यानंतर 2016-2017 मध्ये जगातील सर्वात मोठा व्यापार मेळा जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिथेही त्यांना विनामूल्य येण्याचे निमंत्रण दिले होते.

रुमा देवीं यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जे यश मिळवले आहे ते सर्व महिलांना प्रेरणा देते. झोपडीमध्ये राहणारी महिला परदेश दौरा करून येते. ही खरच खूप अभिमानास्पद कामगिरी आहे. रुमा देवी यांचे कार्य खरच खूप कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page