सायकल दुरुस्ती करणाऱ्या वडिलांची मान अभिमानाने उंचावली.. लेक करणार नासा मध्ये संशोधन..

मेहनत करायची तयारी तसेच जिद्द आणि कामावरील प्रेम, या गोष्टींच्या बळावरच आपण कोणतेही यश सहज साध्य करू शकतो. आज आपण अशाच एका कॉलेज विद्यार्थिनी बद्दल जाणून घेणार आहोत. रायपूर येथील छत्तीसगडमधल्या महासमुंद जिल्ह्यातील एका छोट्या आदिवासी पाड्यात राहणारी रितीका ध्रूव ही महासमुंद जिल्ह्यात असणारे नयापारा येथील स्वामी आत्मानंद इंग्रजी महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे.

रितीकाचे वडिलांचे सिरपूर येथे सायकल दुरुस्तीचे छोटे दुकान आहे. रीतिकाला शिक्षणासाठी दररोज 43 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शाळकरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट सेंटर यांनी लघुग्रह संशोधन उपक्रम सुरू केला आहे. नासा आणि इस्रो यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली आहे. याअंतर्गत भारतातील सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये रितिका ध्रूव ची निवड झाली आहे. तिने व्हॅक्यूम क्लीनर या विषयावरील सादरीकरण केले आहे. रितीकाला नासामध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. लहानपासूनच रितीकाला अंतराळातील गोष्टींबाबत फार आवड होती. तिने आंतराळाशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवला होता.

रितीकाला प्रत्येक वेळी तिच्या शिक्षकांनी आणि पालकांनी प्रोत्साहन दिले असे ती म्हणते. ती आपल्या यशाचे सगळे श्रेय आपल्या आईवडील आणि शिक्षकांना देते. रीतिकाने मिळवलेले हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे देशभरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page