या कारणामुळे डॉक्टर वडिलांनी शेणाने लेपलेल्या गाडीतून दिला आपल्या लाडक्या मुलीला निरोप..

आजकाल लग्नसमारंभात अनेक अनोख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न आजकाल अधिक केला जातो. जेणेकरुन ते सगळ्यांच्या स्मरणात राहील, तसेच त्याची चर्चा व्हावी. असेच एका वडीलांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या पाठवणी करताना एक अनोखी गोष्ट केली आहे.

महाराष्ट्रातील मराठवाड्यात राहणारे डॉक्टर आणि वैज्ञानिक नवनाथ दुधाल हे मुंबईमधील टाटा रुग्णालयात काम करत होते. मे महिन्याला सुरूवात झाली की उष्णता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरूवात होते. आणि अशा वेळेस नवनाथ यांना सतत त्यांच्या कारचा एसी वाढवावा लागायचा. काहीवेळेस एसी वाढवून देखील गरमी काही कमी व्हायची नाही.

यामुळे त्यांनी सेवा निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी समा राजीव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादमध्ये गुरुकुल गौशालाची सुरुवात केली. आणि येथे त्यांनी शेणखताचे संशोधन करायला सुरुवात केली. या संशोधनामधून त्यांना समजले की शेण हे उष्ण किंवा अतिउष्ण तापमान कमी करू शकते.

तापमान कमी करण्याचा विचार करून नवनाथ यांनी त्यांच्या स्वतःच्या कारला शेण लावून कव्हरिंग केले. यासाठी त्यांना तब्बल 30 किलो शेणाचा वापर करावा लागला. उन्हाळ्यात गायीच्या शेणाचा लेप लावल्याने गाडी लवकर थंड होते. असे केल्याने उष्णता तर कमी होतेच त्याचरोबर पाण्याचा होणारा अपव्यय देखील टाळता येतो. यामुळे दिवसाला 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते तसेच गाडी सहा महिने धुवावी लागत नाही. असे नवनाथ यांनी सांगितले.

नवनाथ यांनी त्यांच्या मोबाईल कव्हरवरला सुद्धा शेणाचा लेप लावला आहे. कव्हरला शेण लावल्यामुळे मोबाईल मधील अतिनील किरणांपासून संरक्षण होते, असे नवनाथ यांनी सांगितले. शेणापासून तयार केलेल्या मूर्ती देखील त्यांनी आपल्या गाडीत ठेवल्या आहेत.

शेणाचे कव्हरिंग केल्यानंतर उन्हाळ्यात गाडीचे तापमान कमी करण्यासाठी एसीचा वापर कमी करावा लागला, असे नवनाथ यांनी सांगितले आणि याच गाडीचा वापर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात देखील केला आहे. त्यांनी आपल्या मुलीची पाठवणी करण्यासाठी चक्क या शेणाचा लेप लावलेल्या कारचा उपयोग केला आहे.

आपण नेहमी मुलीची पाठवणी करताना फुलांनी सजवलेल्या गाड्या तसेच महागड्या आकर्षित रंगाच्या गाड्या पहिल्या आहेत. परंतु या वडीलांनी आपल्या मुलीला निरोप देण्यासाठी या अनोख्या गाडीचा वापर केला आहे. यामुळे सध्या हा सो’श’ल मी’डि’या’व’र चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page