एकेकाळी सायकलवर गूळ विकला, आज पुण्यातील या दोन भावांनी उभे केले 20 कोटींचे साम्राज्य..

कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो. जर आपल्यात आत्मविश्वास असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर आपण त्यात यश नक्कीच मिळवू शकतो. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपण यश मिळवत आपले साम्राज्य उभे करू शकतो आणि हे खरे करून दाखवले पुणे जिल्ह्यातील खालकर बंधू यांनी. सायकल वर गूळ विकून त्यांनी सुरवात केली होती आणि आज त्यांनी करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे.

तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे. त्यांचा हा गूळ फक्त भारतात खपत नाही तर जवळपास 25 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केला जातो. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल आज 20 कोटीच्या वर आहे. व्यवसायात थोडा तोटा झाल्यावर माघार घेणाऱ्या लोकांसाठी हे बंधू आदर्श उदाहरण आहेत.

अमित आणि अनिकेत या दोन भावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. दोन्ही भावांनी आपले शिक्षण पूर्ण केले परंतु यात ते समाधानी नव्हते. त्यांना स्वतःचा असे काहीतरी व्यवसाय उभा करायचा होता.

ते शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीच्या निगडित असा काहीतरी व्यवसाय करायचा होता. दोघांनी बाजारपेठेचा नीट अभ्यास केला आणि परीक्षण केले आणि त्यातून त्यांनी गूळ व्यवसायात उतरण्याचे ठरवले. गावातुन सुरू केलेला व्यवसाय आज दोन्ही भावांनी परदेशात नेऊन ठेवला आहे.

गुळाच्या उत्पादनासाठी त्यांना शेतकऱ्यांचा विश्वास जिंकून घ्यायचा होता आणि त्यांना देखील यातून फायदा करून घ्यायचा होता. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची एक साखळी बनवली. शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा हा हेतूने त्यांनी कारखान्यापेक्षा जास्त भाव प्रति टन ऊसाला दिला. याचाच परिणाम म्हणून आज 300 हुन अधिक शेतकरी यांच्याशी जोडले गेले आहेत.

गूळ विक्रीसाठी त्यांनी त्यांचे स्वतःचे गौरी नावाचे ब्रँड उत्पादन बाजारात आणले. त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून अजूनही उत्पादनच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत. पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या निर्मितीसह ते ऑटोमोबाईल क्षेत्रात देखील उतरले आहेत.

पण त्यांच्या हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक अडथळे पार करत हे यश गाठले आहे. सुरवातीला कर्ज मागायला गेल्यावर बँकांनी त्यांना दारात उभे सुद्धा केले नाही. सुरवातीचे अडथळे पार करत, अनेक संकटाना झेलत परंतु संयम राखत त्यांनी त्यांच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page