पत्नीच्या मृ’त्यूनंतर विरह सहन न झाल्याने काही तासांतच पतीने देखील सोडला जीव..

लग्नाचे बंधन हे पवित्र बंधन मानले जाते. लग्नाच्या वेळी नवरा-बायको सात जन्म एकत्र राहण्याचे आणि सुखात आणि दुःखात एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. परंतु लग्नाच्या 60 वर्षानंतर देखील एका वृद्ध जोडप्याने त्यांचे हे वचन पाळले आहे.

या दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की, एकाचा मृ’त्यू झाल्यानंतर तासाभरात दुसऱ्यानेही आपला जीव सोडला. ही घटना खरनोग जिल्ह्यातील आहे. याठिकाणी, एका 90 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्या 80 वर्षीय पत्नीचा मृ’त्यु झाल्यानंतर काही तासांतच तिच्या विरहात आपल्या देखील आयुष्याचा त्याग केला.

लग्नाच्या वेळी एकमेकांना दिलेले वचन त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले. 80 वर्षीय मृ’त सीताबाई आणि त्यांचे पती 90 वर्षीय नानु गोस्वामी यांची एकत्रच अं’तिम यात्रा काढण्यात आली.

आश्चर्याची बाब म्हणजे सीताबाई यांचा मृ’त्यु रविवारी रात्री 8 वाजता झाला तर नानु गोस्वामी यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा आठच्या सुमारास मृ’त्यु झाला. पत्नीच्या नि’ध’ना’नंतर पतीला या विरह सहन झाला नाही.

या घटनेनंतर संपूर्ण गावात शो’क’कळा पसरली होती. त्यांची मुले कैलास आणि श्याम यांनी आपल्या आई-वडिलांना मु’खा’ग्नी दिला. दोघांनीही आयुष्यात खूप संघर्ष करून 4 मुले आणि 2 मुलींचा सांभाळ केला. प्रकृती चिंताजनक असल्याने दोघेही गेल्या 3 वर्षांपासून घरीच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page