अपमान झाल्याशिवाय जाग येत नाही.. एकेकाळी 5 हजाराची नोकरी केली, आज स्वतःचा व्यवसाय सुरू करून बनला करोडपती!

आज आम्ही तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत, त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी स्वतःला तर यशस्वी बनवलेच परंतु ते आज आपली तरुण पिढी घडवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देखील देत आहेत. त्या व्यक्तीचे नाव आहे शरद तांदळे.

शरद तांदळे हे नाव आज अनेक तरुण लोकांच्या प्रेरणेचे कारण आहे. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील वंजारवाडी येथे झाला. त्यांचे आई-वडील हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते आणि शरद यांचे शिक्षण देखील जिल्हापरिषदेच्या शाळेत झाले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

इंजिनिअरिंगची पदवी तर घेतली पण पुढे काय ? या उत्तराच्या शोधात ते पुण्यात आले आणि त्यांनी इकडे येऊन भोसरी MIDC मध्ये काही काळ नोकरी केली. विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात त्यांनी MPSC साठी देखील प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.

जसे आजकाल मुले एकमेकांच्या सांगण्यावरून विविध कोर्सेस जॉईन करतात त्याचप्रमाणे शरद यांनी देखील पुण्यात SAP च्या कोर्स केला. त्यांनी एमबीए साठी देखील प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

एकदा रूमवर पेस्ट कंट्रोल आणि कलरिंग करण्यासाठी आलेल्या माणसाकडून त्यांना व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर काम करण्यास सुरवात केली कारण यात नफा जास्त होता आणि हा खरा त्यांच्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरला.

हळूहळू त्यांचा या व्यवसायात जम बसत गेला आणि त्यांना कामे मिळत गेली. याचाच परिणाम म्हणून त्यांना 2013 साली YOUNG ENTREPRENUER AWARD लंडनला प्रिन्स यांच्या हातुन मिळाले. आजकाल मराठी तरुण नोकरीच्या मागे धावत असतो परंतु शरद तांदळे हे नेहमी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करत असतात. त्यांचे प्रेरणादायी व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page