कुटुंबातील सदस्यांनी वाढदिवसाची सगळी तयारी केली होती, परंतु, मुलगा सरप्राईज पाहण्यापूर्वीच हे जग सोडून गेला..

जीवन-म’र’ण या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल याची शाश्वती कोणालाही नाही. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. ज्यात मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सगळी तयारी केली होती, परंतु मुलगा हे सरप्राईज पाहण्याआधीच हे जग सोडून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भरतपूर येथे राहत असलेल्या एका कुटुंबात मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सरप्राईज ठेवले होते. त्या मुलाचे नाव अरिहंत जैन असून त्याचा वाढदिवस होता. राजस्थानच्या लेक सिटी उदयपूरमध्ये अरिहंतच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती.

कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या खास दिवशी मध्य प्रदेशातील येथील उज्जैन मधील महाकालला भेट देण्याचे ठरवले होते. तेथे गेल्यानंतर संपुर्ण कुटुंब व्यवसायाची जबाबदारी अरिहंतकडे सोपवून त्याला आश्चर्यचकित करणार होते. परंतु, म्हणतात ना वेळ कोणासाठी ही थांबत नाही. पुढे काय होणार आहे हे आपण कोणीही सांगू शकत नाही.

असेच काहीसे अरिहंतच्या बाबतीत घडले. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा हे जग सोडून निघून गेला. राजस्थानमधील भरतपूर येथील कमान तहसीलचा रहिवासी असलेला अरिहंत जैन याचा रात्रीच्या वेळेस टोंक येथे रस्ता अ’प’घा’ता’त दु’र्दै’वी अं’त झाला. या दु’र्दै’वी अ’प’घा’तात अरिहंतसोबत त्याच्या तीन मित्रांनाही आपला जीव ग’मा’वा’वा लागला.

वृत्तानुसार, भरतपूर कमान येथील रहिवासी असलेले हे पाच व्यावसायिक मित्र हे एका कारमधून बाहेर पडले. त्यांना उदयपूरहून उज्जैनला जायचे होते. वाटेत टोंक जिल्ह्यातील देवळीजवळ रात्री उशिरा त्यांची कार ट्रॅक्टरला जोरदार ध’ड’क’ली. यात अरिहंत जैन, दिवाकर शर्मा, हेमंत अग्रवाल आणि कृष्णा सैनी हे चार मित्र जागीच ठा’र झाले आणि एकजण जखमी झाला.

या चारही मित्रांच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शो’क’का’ळा पसरली होती. अरिहंत जैन हा राजू जैन यांचा एकुलता एक मुलगा होता. तसेच दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस देखील होता. वाढदिवसाची भेट म्हणून संपूर्ण कुटुंबीय व्यवसायाची जबाबदारी अरिहंत वर सोपवणार होते.

अरिहंतच्या वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. मात्र, काळाने घा’त केला आणि अरिहंतचा रस्ता अ’प’घा’तात त्याचा दु’र्दै’वी मृ’त्यू झाला. या घटनेमुळे जैन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page