आईने दुसऱ्यांच्या घरी घरकाम करून मुलीला शिकवले, पहिल्याच प्रयत्नात मुलीने मिळवले घवघवीत यश, आज आहे IPS अधिकारी

दरवर्षी लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देत असतात. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. जे उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांच्या विजयाची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. अशा अनेक अविश्वसनीय वाटणाऱ्या कथा आहेत. आज आपण अशीच एक कहाणी पाहणार आहोत, जी वाचल्यानंतर तुमचा विश्वास वाढेल की मेहनत आणि संघर्षापुढे सर्व काही फिके आहे.

हरियाणामधील महेंद्रगड येथील निंबी गावात राजपूत कुटुंबात 1996 साली दिव्या यांचा जन्म झाला. दिव्या या अत्यंत साध्या आणि शेतकरी कुटुंबातील मुलगी आहेत. त्यांचे आईवडील आणि त्यांचा भाऊ आणि बहीण असा त्यांचा परिवार होता.

मात्र, 2011 मध्ये दिव्या यांच्या वडिलांचे अचानक आजारपणामुळे नि’ध’न झाले. आता त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि लहान भाऊ आणि बहीण आहे. वडिलांचे नि’ध’न झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी दिव्या आणि त्यांच्या आईवर आली.

दिव्या यांनी महेंद्रगडच्या निंबी जिल्ह्यातील मनू हायस्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अभ्यासाचे ओझे आईवर पडू नये, म्हणून त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यात प्रवेश घेतला आणि तिथून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

दिव्या यांची आई दुसऱ्यांच्या शेतात काम करायची आणि घरोघरी जाऊन घरकाम देखील करत असत. कुटुंबाचा सगळा भार एकट्या आईवर पडू नये म्हणून दिव्या आपला अभ्यास सांभाळून मुलांचे क्लासेस घेत असत. अशाप्रकारे पुढे त्यांनी महेंद्रगढच्या सरकारी पीजी महाविद्यालयातून आपले बीएससीचे पदवी शिक्षण पूर्ण केले.

यानंतर पुढे दिव्या यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्या लहापणापासूनच अभ्यासात हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी युपीएससी परिक्षेचा अभ्यास देखील खूप मेहनतीने केला. त्यांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. त्यांनी दिवसातून 10 तास अभ्यास केला. यादरम्यान त्यांच्या आईनेदेखील त्यांना चांगली साथ दिली.

अखेर दिव्या यांनी पहिल्याच प्रयत्नात 2011 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस अधिकारी बनल्या. त्या आपल्या या यशाचे सगळे श्रेय आपल्या आईला देतात. अशाप्रकारे संघर्ष करून त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले. त्यामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page