महाराष्ट्राची ही लेक वर्षाला करतेय तब्बल 72 लाखांची कमाई! वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी कौटुंबिक दुग्धव्यवसायाची जबाबदारी घेतली हाती..

यशस्वी होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. आपल्याजवळ कामाचा अनुभव, मेहनत आणि चिकाटी असेल तर ते तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जातेच. शिक्षणाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या मुली देशाची शान मानली जातात.

आज आपण अशाच एका महाराष्ट्राच्या कन्येची कहाणी जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहणारी श्रद्धा धवन हिने वयाच्या 11व्या वर्षापासून कौटुंबिक दुग्ध व्यवसायात मदत करत आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे.

अहमदनगरपासून 60 किमी अंतरावर निघोज या गावात श्रद्धा धवन तिच्या कुटुंबासह राहते. श्रद्धा गेल्या 12 वर्षांपासून दुग्धव्यवसाय सांभाळत आहे. ती स्वतः म्हशींचे दूध काढते आणि सकाळी घरोघरी दूध पोहचवण्याचे काम करते.

श्रद्धा धवन हिचे वडील दुग्धव्यवसाय करायचे, यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. ते हा व्यवसाय अनेक वर्ष झाले करत आहेत. त्यामुळे लहानपणापासून वडिलांसोबत म्हशींचे दूध काढणे आणि त्यांना चारा घालणे ही कामे श्रद्धाला खूप आवडायची. मात्र, तिची ही आवड पुढे भविष्यात तिचा छंद बनेल हे श्रद्धाला कधी वाटले नव्हते.

एकदा श्रद्धाच्या वडिलांची तब्येत अचानक खालवली होती त्यामुळे त्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ लागला. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या डेअरी फार्ममध्ये केवळ एकच म्हैस शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली होती. अशा परिस्थितीत असताना श्रद्धाने तिच्या वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तिने वडिलांचा दुग्धव्यवसाय चालवायला सुरुवात केली.

श्रद्धाने डेअरी फार्ममचा कारभार चालवायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्याकडे केवळ एकच म्हैस होती. अशावेळेस श्रद्धाने रात्रंदिवस भरपूर मेहनत घेऊन काही दिवसांतच 4 ते 5 म्हशी खरेदी केल्या आणि पुन्हा एकदा दुग्ध व्यवसाय सुरुळीत केला.

श्रद्धाने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी दुग्धव्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेक लहानसहान गोष्टी शिकल्या होत्या. तेव्हा तिला अधिक दूध देणाऱ्या म्हशींच्या जा’तीं’ची देखील माहिती मिळाली होती. अशारीतीने श्रद्धाने हळूहळू तब्बल 80 हून अधिक म्हशींची शेती सांभाळण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आज श्रद्धा दर महिन्याला 6 लाखांहून अधिक नफा मिळवत आहे.

यादरम्यान अनेकांनी तिच्या या कामावर आक्षेप घेतला. परंतु श्रद्धाने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कारण तिच्यावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी होती. तेव्हा श्रद्धाचा भाऊ लहान असल्यामुळे श्रद्धाने रात्रंदिवस मेहनत करून डेअरी फार्म हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला. श्रद्धाने यासाठी वेळापत्रक बनवले ज्यामुळे तिला हा व्यवसाय सांभाळत अभ्यासाला देखील वेळ देता येत होता.

पुढे 2012 मध्ये श्रद्धाच्या वडिलांनी तिला डेअरी फार्मची संपूर्ण जबाबदारी दिली. यानंतर श्रद्धाने सगळी जबाबदारी चोखपणे पार पाडली. श्रद्धा पहाटे उठून म्हशींना चरायला घेऊन जायची. त्यानंतर त्यांचे दूध काढून ते दुचाकीवरून लोकांच्या घरोघरी पोहचवायची.

गावात दूध वाटून परत आल्यानंतर तयारी करून श्रद्धा शाळेत जायची आणि संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा म्हशींना चारा देऊन, दूध काढून ते घरोघरी पोहचवण्याचे काम करायची. हा तिचा रोजचा दिनक्रम असायचा.

2015 साली डेअरी फार्मची संपुर्ण जबाबदारी श्रद्धाच्या खांद्यावर असूनही तिने 10वी मध्ये चांगले गुण प्राप्त केले. यानंतर तिने भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिच्या धाकटा भावाने डेअरी फार्मिंगचा कोर्स करत होता. जेणेकरून पुढे जाऊन तो आपल्या बहिणीला व्यवसायात मदत करू शकेल.

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वयाच्या 11 व्या वर्षी दुग्ध व्यवसाय करणारी श्रद्धा धवन सध्या वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. आज श्रद्धाने आपल्या मेहनतीच्या जोरावर 80 हून अधिक म्हशींचे डेअरी फार्म उभारले आहे आणि ते उत्तमरित्या सांभाळत देखील आहे.

श्रद्धाच्या डेअरी फार्ममध्ये असलेल्या म्हशी दररोज 450 लीटरपेक्षा जास्त दूध देतात. आजही श्रद्धा एकटी 20 म्हशींचे दूध काढते, तर बाकीच्या म्हशींचे दूध काढण्यासाठी तिने काही मजूर ठेवले आहेत. श्रद्धाचे डेअरी फार्म आता दुमजली झाले असून बाईकऐवजी ती आता बोलेरो मध्ये दूध पोहचवायला जाते.

दुग्धव्यवसाय हे सहसा पुरुष किंवा घरातील मुले करतात, पण श्रद्धाने तिच्या मेहनतीतून आणि समर्पणाने ही रूढी बदलण्याचे काम केले आहे. वयाच्या 23व्या वर्षी निघोज गावातील इतर मुली कॉलेजला जातात, त्या वयात श्रद्धा लाखो रुपयांचा व्यवसाय करत आहे.

वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षापासून कौटुंबिक दुग्ध व्यवसायात मदत करत मेहनतीच्या जोरावर आज वयाच्या 23व्या वर्षी तिने वडिलांच्या डेअरी फार्मचा नकाशा बदलला आणि आता ती हा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page