बसमध्ये अडकून राहिल्यामुळे चार वर्षीय चिमुकलीचा त’डफडून झाला मृ’त्यू, वाढदिवसाच्या दिवशीच काळाने केला घा’त.

अभिलाष चाको आणि सौम्या यांना दोन मुली आहेत. हे कुटुंबीय मूळचे केरळच्या पान्नीमाट्टोमचे रहिवासी आहेत. अभिलाष चाको क’ता’र’मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असल्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून ते क’ता’र’मधील वाक्रा येथे राहत आहेत.

मिन्सा हीचा रविवारी वाढदिवस होता. मिन्सा चार वर्षांची होती आणि ती केजीमध्ये शिकत होती. ती रविवारी सकाळी बसने शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा तीची बसमध्येच झोप लागली.

बस शाळेत पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी बसमधून खाली उतरले. परंतु मिन्साची झोप लागल्यामुळे ती बसमधून खाली उतरली नाही आणि बस चालक आणि वाहकाचेही लक्ष झोपलेल्या मिन्साकडे गेले नाही. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले म्हणून बस चालकाने एसी बंद केला आणि ते बस लॉक करून तेथून निघून गेले.

काही तासांनी शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस चालक आणि वाहक बसजवळ आले. त्यांनी दार उघडले तेव्हा त्यांना तिथे मिन्सा दिसली. मिन्साला तिथे पडलेले पाहून तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. मिन्साचे प्रा’ण गे’ले होते.

बाकीचे सगळे विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर बस चालकाने एसी बंद केल्यामुळे मिन्साला श्वास घ्यायला जमले नाही आणि त्यामुळे तिचा त’ड’फ’डू’न मृ’त्यू झाला. क’ता’र येथील उच्च शिक्षण मंत्रालयाने मिन्साच्या मृ’त्यू’बा’ब’त शो’क व्यक्त केला आहे. मंत्रालयाने संबंधित विभागाच्या मदतीने या घटनेचा तपास सुरू केलेला आहे.

मृ’त्यू झाला त्या दिवशी चिमुकल्या मिन्साचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी काळाने तिचा घा’त केला. अचानक झालेल्या तिच्या मृ’त्यू’मु’ळे तिच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page