या डॉक्टरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन त्यांच्या रुग्णांना देखील समजते, हस्ताक्षर बघून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन कसे असते हे जवळपास आपण सगळ्यांनीच पाहिले असेल. अनेकदा आपण पाहतो की, डॉक्टर जे प्रिस्क्रीप्शन आपल्याला देतात त्यामध्ये नक्की कोणती औषधे लिहून दिली आहेत हे कधीच आपल्याला समजत नाही. हे प्रिस्क्रिप्शन केवळ डॉक्टरच समजू शकतात किंवा मेडिकल स्टोअरचा फार्मासिस्ट.

अनेकदा डॉक्टरांच्या हस्ताक्षरामुळे लोक त्यांची खिल्ली उडवत असतात. तसेच अनेकदा यासंबंधित अनेक व्हिडिओज आणि मीम्स समोर येत असतात. मात्र, याउलट आता सो’श’ल मी’डि’या’व’र एका डॉक्टरने सुंदर हस्ताक्षरात लिहलेले प्रिस्क्रीप्शन जोरदार धुमाकूळ घालत आहे. या डॉक्टरचे हस्ताक्षर हे त्यांच्या रुग्णांना देखील समजते. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

आपल्याला फोटो मध्ये दिसत असणारे हे सुंदर हस्ताक्षर केरळचे डॉ. नितीन नारायणन यांचे आहे. हे डॉक्टर केरळमधील पलक्कड येथील नेनमारा येथे असणाऱ्या कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये बालरोगतज्ञ म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत.

डॉ. नितीन नारायणन यांनी त्रिशूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनतर त्यांनी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे त्यांनी आपले एमडीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वृत्तानुसार, डॉ. नितीन नारायणन सांगतात, त्यांना लहानणापासूनच लिहिण्याची आवड होती त्यामुळे त्यांचे हस्ताक्षर लहानपणापासूनच चांगले आहे. डॉ. नितीन यांनी त्यांची ही कला कधीच सोडून दिली नाही. त्यामुळे ते नेहमी प्रिस्क्रिप्शन लिहिताना देखील आपली ही कला कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

डॉ. नितीन यांच्या सुंदर हस्ताक्षरामुळे त्यांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन रुग्णांना उत्तमप्रकारे वाचताही येते आणि समजते देखील. डॉ. नितीन सांगतात, आपण सर्रास पाहत असतो की कित्येक डॉक्टरांनी लिहिलेले प्रिस्क्रीप्शन हे त्यांच्या रूग्णांना कधी वाचताच येत नाही. ते केवळ त्या डॉक्टरांना किंवा फार्मासिस्टलाच समजते.

परंतु, डॉ. नितीन हे कितीही घाईत असले तरीही ते रूग्णांना समजेल अशा सुवाच्च अक्षरात अगदी स्पष्टपणे प्रिस्क्रीप्शन लिहितात. जेणेकरुन डॉक्टरांनी काय लिहिले आहे ते रूग्णांना ही समजेल आणि त्याची पडताळणी देखील करता येईल. सर्व डॉक्टरांनी अशाच प्रकारे रूग्णांना समजेल अशा सुंदर हस्ताक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहायला हवे असे माझे मत आहे, असे डॉ. नितीन सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page